पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
श्री विठ्ठल रुक्मिणी योग प्राणायाम संस्था पंढरपूर यांच्या वतीने आज जागतिक योग दिनाच्या निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणीच्या प्रतिमेचे पूजन करून योग भवन येथे योग प्राणायाम सराव शिबिर घेण्यात आली सलग सात दिवस हे शिबिर चालणार आहे या योग वर्गात सूर्यनमस्कार पूरक हालचाली व प्राणायाम शिकवण्यात आले.
जागतिक योग दिनाच्या निमित्ताने बोलताना संस्थेचे अध्यक्ष अँड .सुनील वाळुजकर यांनी सांगितले की,भारतीय संस्कृतीमधील "योग" संकल्पनेची मांडणी श्रीमदभगवद्गीता ग्रंथात केलेली आहे.तसेच भगवान पतंजली मुनी यांनी आपल्या योगसूत्राद्वारे मानवाच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक विकासाची संकल्पना स्पष्ट केली आहे. याद्वारे आध्यात्मिक उन्नतीही साधता येते असे पतंजली योगसूत्र ग्रंथात सांगितले आहे. रामदेव बाबा यांनी योगाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जनजागरण केले असून हा योग जगाने स्वीकारला आहे
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर २०१४ मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत २१ जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला होता. संयुक्त राष्ट्रांच्या १९३ देशांपैकी १७५ देशांचे सहप्रतिनिधींनी या प्रस्तावाला पाठींबा दिला होता. सुरक्षा आयोगाचे कायमस्वरूपी सदस्य असलेले अमेरिका, इंग्लंड, चीन, फ्रान्स, रशिया यासारखे देशही या प्रस्तावाचे सहप्रतिनिधी आहेत. यावर विस्तृत चर्चा होवून डिसेंबर २०१४ मध्ये या दिनाला मान्यता देण्यात आली. २१ जून २०१५ रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस जगभर साजरा करण्यात आला व आता संपूर्ण जगात हा जागतिक योगा दिन साजरा केला जात असल्याची माहिती यावेळी दिली.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे उपाध्यक्ष तथा प्रशिक्षक रवींद्र कोडग, सचिव प्रशांत आगवणे, अँड रामलिंग कोष्टी, निसार शेख, आप्पासाहेब मुचलंबे, प्रदीप कौलवर व इतर सहकारी यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले. यावेळी सर्व योगी साधक व शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते