भाळवणी प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर तालुक्यातील धोंडेवाडी येथे आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे योगा दिवस साजरी करण्यात आला.
यावेळी योगा बद्दलची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली आणि योगा प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले दैनंदिन जीवनात योगाचे महत्व किती आहे हे विद्यार्थ्यांना समजून सांगण्यात आले. या कार्यक्रमास शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते पाटील, प्राचार्य आर जी नलवडे, मुख्याध्यापक शशिकांत महाजन, शिक्षक भोसले, जमदाडे उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडण्यासाठी कार्यक्रम समन्वयक एस एम एकतपुरे कार्यक्रमाधिकारी एम एम चंदनकर व कृषीदूत चे सर्व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.