पंढरपूर प्रतिनिधी नंदकुमार देशपांडे तेज न्यूज
जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार समाधान आवताडे, आमदार अभिजीत पाटील, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, प्रांत अधिकारी सचिन इथापे, मुख्याधिकारी महेश रोकडे, तहसीलदार सचिन लंगुटे,युवा नेते प्रणव परिचारक, माजी नगरसेवक विवेक परदेशी, विक्रम शिरसट, माऊली हळणवर यांच्या शुभहस्ते श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती व पंढरपूर नगरपरिषद यांच्या सहकार्यातून पंढरपूर शहरातील कार्यरत असलेल्या वृक्षप्रेमी ग्रुप च्या वतीने भक्ती सागर 65 एकर येथे 51 वृक्षांची लागवड करण्यात आली.
यावेळी बोलताना वृक्षप्रेमी ग्रुपचे प्रमुख अँड.सुनिल वाळूजकर व सोमनाथ होरणे यांनी सांगितले की ,श्री विठुरायाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भुवैकुंठ पंढरी नगरीमध्ये आषाढी कार्तिकी माघी चैत्री व प्रत्येक महिन्याच्या एकादशीला लाखो करोडो भाविक भारताच्या व जगाच्या कानाकोपऱ्यातून विठूरायाच्या दर्शनासाठी येतात सुमारे ३ ते ४ लाख भाविक हे आषाढी यात्रेमध्ये 65 एकर भक्ती सागर येथे वास्तव्यास असतात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करावी म्हणून पालकमंत्री जयकुमार गोरे व जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी यापूर्वी सूचना दिल्या होत्या त्यानुसार मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन केले होते. विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सदस्य शिवाजीराव मोरे महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली नगर परिषदेच्या सहकार्याने गेल्या एक महिन्यापासून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात येत आहे. सुमारे ५०१ वृक्ष या ठिकाणी वृक्षप्रेमी ग्रुपच्या माध्यमातून लावण्याचे काम चालू आहे.
आज जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने पालकमंत्री महोदय यांच्या शुभहस्ते आज वृक्षारोपण करण्यात आले
पंढरपूर शहरांमध्ये असणारे ओपन स्पेस, गृहनिर्माण संस्था, शहरातील मुख्य रोड, प्रदीक्षणा मार्ग, शाळा कॉलेज या ठिकाणी गेल्या वर्षात १८५० झाडे लावण्यात आली होती व यावर्षी सुमारे ३००० झाडे लावण्याचा संकल्प सर्व वृक्षप्रेमी ग्रुपने सोडला असल्याचे यावेळी होरणे यांनी सांगितले नुसते झाडे न लावता ते जोपासणे व जगवण्यासाठी ही सर्वजण प्रयत्न करणार आहेत यावेळी स्वप्नील मोरे, संजय साबळे राजेंद्र तिवाटने सुहास शिर्के वैभव येवनकर,सतीश खडके विवेक बडवे, दत्ता पाटील,जयप्रकाश मांगले, ओंकार वाळूजकर,सौ वर्षा चंकेश्वरा, नाना शिंदे , हे वृक्षप्रेमी उपस्थित होते