पुळूज प्रतिनिधी तेज न्यूज दत्तात्रय पांढरे
जिल्हा हिवताप अधिकारी बागल, सहाय्यक जिल्हा हिवताप अधिकारी चव्हाण यांचे मार्गदर्शन व सूचनेप्रमाणे दिनांक 16 मे 2025 रोजी मौजे सरकोली येथे राष्ट्रीय डेंग्यू दिन साजरा करण्यात आले.
समाजात डेंग्यू आजाराविषयी जनजागृती व्हावी या उद्देशाने राष्ट्रीय डेंग्यू दिन साजरा करण्यात आले. डेंग्यू हा आजार येडीस इजिप्ती या प्रजातीच्या मादी डासाच्या चावल्यामुळे होतो. या डासाची मादी ही स्वच्छ पाण्यात अंडी घालते. अंडी अळी कोश आणि डास उत्पत्ती होते जसे की बॅरल, हौद ,पिंप, पाण्याच्या टाक्या, फ्रिज, कुलर्स, निरोपयोगी वस्तू व इतर भंगार या मध्ये साचलेल्या पाण्यात अंडी घालतात. याबाबत आरोग्य शिक्षण देण्यात आले. डेंग्यू आजाराचे चिन्ह व लक्षण व उपचार तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजना इत्यादी बाबत आरोग्य शिक्षण देण्यात आले. गप्पी मासे बाबत माहिती देण्यात आले.
यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सासवडकर व डॉक्टर भोसले , तालुका हिवताप पर्यवेक्षक जगताप,आरोग्य निरीक्षक जमादार,प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी जगदाळे,यांनी डेंग्यूच्या प्रसार व प्रतिबंधात्मक उपाय यावर मार्गदर्शन केले व आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळणे बाबत आवाहन करण्यात आले.
या कार्यक्रमास आरोग्य सेवक मल्हाव, येडगे, हत्तीकट, पाटील, गुरव, भोसले, शिंदे व सर्व आरोग्य सेविका व आशा स्वयंसेविका तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.