सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
श्री सिध्देश्वर देवस्थान संचलित वर्ष २०२४-२५ च्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परी क्षेत श्री सिद्धेश्वर इंग्लिश मीडियम हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवत शाळेच्या गौरव परंपरेत मानाचा तुरा खोवला आहे. विद्यार्थ्यांनी यावर्षीही १००% टक्के निकालाची गौरव परंपरा कायम ठेवली.
दहावीच्या परीक्षेत सुयश मिळविलेले गुणवंत विद्यार्थी...
१) भुरळे श्रावणी गणेश ९९.४०%
२) अंबुरे सुरज गणेश ९८.६०%
३) कोळेकर समृद्धी राजेंद्रकुमार ९७.४०%
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे शाळेच्यावतीने कौतुक व सत्कार करण्यात आला.
श्री सिद्धेश्वर देवस्थान शिक्षण संकुलाचे चेअरमन मा. श्री. धर्मराज काडादी व शिक्षण समितीचे सदस्य मा. श्री विलास कारभारी, ॲड.श्री रेवणसिद्ध पाटील, मा.श्री गुरुराज माळगे, मा श्री. राजशेखर येळीकर, मा श्री चन्नबसव नाडगौडा, मा श्री पशुपतिनाथ माशाळ, मा श्री. प्रभुराज मैंदर्गीकर, मा श्री. भीमाशंकर पटणे, समन्वयक श्री संतोष पाटील, मुख्याध्यापक श्री योगेश राऊत व पर्यवेक्षिका सौ निता तमशेट्टी या सर्व मान्यवरांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.