सांगोला प्रतिनिधी तेज न्यूज
फॅबटेक टेक्निकल एज्युकेशन संचलित, फॅबटेक काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च सांगोला येथील स्थापत्य अभियांञिकी विभागात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी सुनियोजित चिञपटगृह, श्रीट्रेडर्स आणि हाॅटेल श्रीराम येथे सदिच्छा भेट दिली असल्याची माहिती स्थापत्य अभियांञिकी विभागप्रमुख प्रा. शिवानंद माळी यांनी दिली.
फॅबटेक काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च सेंटर महाविद्यालयांमधील स्थापत्य अभियांञिकी विभाग द्वितीय व तृतीय वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना विविध संकल्पनेची माहिती व्हावी याशिवाय ती माहिती समजून घेऊन संशोधनास मदत व्हावी, याच दृष्टिकोनातून इमारतीचे प्लॅनिंग,इमारतीचे डिझाईन, बिल्डिंग प्लॅनिंग आणि डिझाईन इ. विषयांची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी यासाठी हि भेट आयोजित करण्यात आली होती. या भेटी दरम्यान हाॅटेल श्रीराम मध्ये किशोरजी शास्ञे, शिवपार्वती चित्रपटगृहामध्ये पांढरेजी आणि शिवकृपा टाईल्सचे साहेबराव इमडे ह्यांनी विद्यार्थांना महत्वपूर्ण मार्गदर्शन केले.
सांगोला येथील सुनियोजित चिञपटगृह, श्री ट्रेडर्स आणि हाॅटेल श्रीराम आदींची ठिकाणची भेट ही फॅबटेक टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा श्रीमती नीलवर्णा बिरासाहेब रूपनर, उपाध्यक्ष भाऊसाहेब रूपनर, सचिव डॉ. अमित रूपनर, कार्यकारी संचालक दिनेश रूपनर, इस्टेट डायरेक्टर डॉ. संजय आदाटे, व्यवस्थापक प्रतिनिधी प्रा. प्राजक्ता रूपनर, प्राचार्य डॉ. रविंद्र शेंडगे, उप प्राचार्या डॉ. विद्याराणी क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती.
हि भेट यशस्वी करण्यासाठी प्रा. अमोल मेटकरी, नियंत्रक प्रमुख शरद आदलिंगे, प्रा. विशाल भाकरे, प्रा. अमोल मेटकरी, प्रविण वेळापुरकर, केंच्चाप्पा दुधाळ सह स्थापत्य अभियांञिकी विभागातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.