देण्यातला आनंद म्हणजेच जॉय
"करशील जे गरिबांसाठी होईल ते मजसाठी"
दिले खावया भुकेल्यांना,
दिले प्यावया तान्हेल्यांना,
उघड्याला पांघरावयाला, केलेसी हे मजसाठी .
खुद्द भगवंत म्हणतात की जे समाजातील तळागाळातील लोकांसाठी आपला वेळ, आपल्या मिळकतीचा काही हिस्सा अर्पण करतात त्यांच्याबरोबर मी आहे.
जॉय ऑफ गिविंग ही संस्था अशा तळागाळातील लोकांसाठी कार्य करते. दीनदलित,आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेला वर्ग ,अनाथ शारीरिक व्यंग असलेले परंतु मनाने खंबीर असलेले ज्यांना आयुष्य मध्ये येऊन परिस्थिती नसतानाही काहीतरी करून दाखवायची उमेद असलेल्या लोकांबरोबर, शहरी आणि ग्रामीण भागात जॉय संस्था कार्यरत आहे.
मला जॉयचा आणि त्याहीपेक्षा जास्त गणेशचा अभिमान वाटतो ."जे पेराल तेच उगवते" गणेश 'निर्मला निकेतन कॉलेज ऑफ सोशल वर्क', "सलोखा" ट्रेनिंग प्रोग्रॅमचा प्रशिक्षणार्थी... पत्रकार .मूर्ती छोटी पण कीर्ती महान अगदी इतरांसाठी कार्य करावं, कम्युनिटीचे प्रश्न सोडवावेत म्हणून तळमळ आणि ही तळमळ फक्त मनातच राहिली नाही तर ती जॉयच्या माध्यमातून प्रत्यक्षात उतरवली आहे.
आपल्या जॉयचे सभासद फक्त मुंबईत नाही तर महाराष्ट्रभर आहे."जॉय"तर्फे व्यक्ती, कुटुंब ,गट आणि समुदाय यांच्या समस्या सोडवण्यासाठी कार्य केले जाते.नैसर्गिक आपत्तीमध्ये नुकसान झालेल्या लोकांपर्यंत आपण महाराष्ट्रभर पोहोचलो आहोत .
सामाजिक कार्य लोकांना समाजाच्या गरजा आणि समस्या ओळखायला शिकवते आणि त्यांना मदत करण्यासाठी प्रोत्साहित करते. समाजातील लोकांना एकत्र आणून एकमेकांना मदत करण्यासाठी प्रोत्साहित करतात .आपण समाजाचे देणेदार आहोत ही भावना उत्पन्न होते. लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी हातभार लावतात .गरजवंत लोक आणि देणगीदार यांच्यामधील bridgeचे काम आपले जॉयचे संस्थापक श्री गणेश हिरवे करत आहेत.
व्यक्तिगत आणि सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी लोक संपर्क आणि लोकांचा विश्वास संपादन करण्याची क्षमता महत्त्वाची असते .मला तर खूप आश्चर्य वाटतं की एखादा प्रोजेक्ट घ्यायचा असेल तर फक्त ग्रुप वर पोस्ट आल्यावर लगेचच आपले सभासद स्वतःहून मदत करण्यास पुढे येतात. लोकांचा गणेशवर विश्वास आहे आणि हेच सर्वात महत्त्वाचे आहे.लोक संपर्क व लोकांचा विश्वास संपादन करण्याची क्षमता महत्त्वाची आहे आणि हीच कला गणेश मध्ये आहे.
Many believe material possessions bring Joy but true lasting Joy comes from self- realization. Until we meet an enlightened one we can find pure Joy by helping others and avoiding causing harm. This selfless act brings immense joy and aligns with the purpose of human life. "Joy of giving", is a family of many hearts where every bond matters and let's cherish the heartbeat in our Joy family where life begins and love never ends.
आज Joy तर्फे आपले सभासद आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या लोकांपर्यंत पोहोचून पुण्य आपल्या पदरी साठवत आहेत . समाजकार्य हे सकारात्मक कर्म आहे आणि जेव्हा आपण एखादे चांगले कार्य समाजासाठी करतो त्यामध्ये इतरांना त्याचा लाभ होतो परंतु त्याहीपेक्षा जास्त आनंद आपल्याला मिळतो आणि आपण आपल्या जीवनामध्ये आणि इतरांच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडवतो. जन्माला येतो तेव्हा रिकाम्या हाताने येतो आणि जातानाही आपल्याला रिकामी हातानेच जावं लागतं म्हणून जीवन- मरणामध्ये जो काळ आहे तो आपण इतरांसाठी सत्कर्मी घालूया आणि असेच जॉय चे वर्धापन दिन साजरे करूया हीच सदिच्छा.
Assumpta D'Souza
Counsellor/ Social Worker
Executive Chairperson
"Joy "