मुंबई प्रतिनिधी गणेश हिरवे
वांद्रे मुंबई येथील सेंट टेरेसा बॉईज शाळेचा यंदाचा दहावीचा निकाल ९३.९३ टक्के इतका लागला आहे .
वंश गुप्ता ९२.८० टक्के मार्क्स मिळवून शाळेतून पहिला आला असून सय्यद अबिद ९२.४० गुणांनी दुसरा आला.या शाळेचा गेल्या वर्षी शंभर टक्के निकाल लागलं होता.यंदा १९८ पैकी १८६ विधार्थी उत्तीर्ण झाले असून ४३ जणांचा उच्च श्रेणी ६२ जणांना फर्स्ट क्लास तर ६१ मुलांना द्वितीय श्रेणी मिळाली आहे.
शाळेच्या इतिहासात याआधी शाळेचा अनेकदा १०० टक्के निकाल लागलेला असून यावेळी कुठे कमी पडलो ते आम्ही नक्कीच पाहू असे मुख्याध्यापक फादर निकी म्हणाले.शाळेतील मुल अभ्यासात आणि खेळात निपुण आहेत आणि आम्हाला त्यांचा अभिमान असल्याचे सर्व शिक्षकांनी सांगितले आहे.