पंढरपूर प्रतिनिधी नंदकुमार देशपांडे तेज न्यूज
वृत्तपत्र विक्रेत्याच्या विविध मागण्यासाठी दिनांक 18 मे रोजी एक दिवशीय जिल्ह्यातील सर्व वृत्तपत्र विक्रेत्यांनी आपला वृत्तपत्र विक्री व्यवसाय बंद ठेवून कडकडीत बंद पाळला आहे आता तरी प्रशासनाने खडबडून जागे होऊन विक्रेत्याच्या मागण्याची दखल घ्यावी अशी अपेक्षा सोलापूर जिल्हा वृत्तपत्र विक्रेता संघटना जिल्हाध्यक्ष जिल्हा उपाध्यक्ष व सर्व सदस्यांनी व्यक्त केली आहे.
अनेक दिवस वृत्तपत्र विक्रेत्याच्या कमिशनमध्ये वाढ व्हावी याच करता वारंवार वृत्तपत्र प्रशासनानं पत्रव्यवहार करून 15 मे रोजी आम्ही आपल्याला सकारात्मक निर्णय देऊ असा पवित्रा घेऊन सोलापूर मधील मीटिंगमध्ये सांगण्यात आले परंतु त्याचे कारवाही 5 मे पर्यंत न झाल्याने जिल्ह्यातील संपूर्ण वृत्तपत्र विक्रेत्यांनी दिनांक 18 मे रोजी पूर्ण जिल्ह्यातील वृत्तपत्र विक्री बंद ठेवून आपला आवाज प्रशासनापर्यंत जावा याकरता सर्वांनीच जागरूक राहून पूर्ण जिल्ह्यात आज वृत्तपत्र विक्री झालेली नाही.
गेले अनेक दिवसापासून वृत्तपत्र विक्रेते संघटना आणि वृत्तपत्र विक्रेत्याच्या कमिशनमध्ये वाढ व्हावी पुरवणी टाकणावळमध्ये वाढवावी व इतर मागण्या साठी वारंवार जिल्ह्यातील सर्वच वृत्तपत्र वितरण व्यवस्थापकांना जिल्हा संघटनेमार्फत व तालुका संघटनेमार्फत ही पत्रव्यवहार करून देखील विक्रेत्याच्या निवेदनाची दखल न घेतल्यानेच नाईलाजाने 18 मे रोजी चा बंद पुकारला आहे. नेहमीप्रमाणे भल्या पहाटेपासून वृत्तपत्र विक्रेते सावरकर पुतळ्यासमोरील फुटपाथवर जमून बंद बाबत घोषणा देत होते. यानंतर सर्व विक्रेते गोपाळ कृष्ण मंदिर जवळील सार्वजनिक वार्ताफलका शेजारी जमून आजचा बंद कशासाठी आहे या घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला होता.
आज संपूर्ण जिल्ह्यात वृत्तपत्र विक्रेत्याने कडकडीत बंद पाडून वृत्तपत्र व्यवसायातील प्रशासनाचे लक्ष वेधले याचवेळी पंढरपूर शहर व जिल्हा तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी वाचकांच्या आजच्या एक दिवशीय झालेल्या गैरसोयीबद्दल क्षमस्व व दिलगिरी ही व्यक्त करून घोषणा दिल्या काही वाचकांनी पंढरपूर आत विक्रेत्यांना भेटून आपला पाठिंबा दर्शवला जिल्ह्यातील वृत्तपत्र विक्रेत्या एक चुकीचा हा छोटासा का होईना पण प्राथमिक विषय आहे