सांगोला प्रतिनिधी तेज न्यूज
फॅबटेक एज्युकेशन सोसायटी (ता. सांगोला) येथील फॅबटेक टेक्निकल कॅम्पसमधील अभियांत्रिकी महाविद्यालयातील स्थापत्य अभियांत्रिकी विभागामध्ये प्रा. तात्यासाहेब जगताप यांचे "स्ट्रक्चरल मेकॅनिक्स भाग-१" या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. हे व्याख्यान मोठ्या उत्साहात संपन्न झाले असल्याची माहिती स्थापत्य अभियांञिकी विभाग प्रमुख प्रा. शिवानंद माळी यांनी दिली.
फॅबटेक काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च सेंटर सांगोला येथे बुधवार दिनांक १४ मे २०२५ रोजी आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानाची सुरवात सरस्वती पूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. दरम्यान महाविद्यालयाचे डीन ऑफ अकॅडमिक्स डॉ. शरद पवार यांच्या हस्ते प्रा. तात्यासाहेब जगताप यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळेस बोलताना तात्यासाहेब जगताप म्हणाले, स्थापत्य अभियांञिकी मध्ये कोणत्याही प्रकारची रचना व त्याचा अभ्यास फक्त विश्लेषण करून पूर्ण होत नाही. तर त्यासाठी शास्त्रीय ज्ञान व अतिरिक्त पद्धती वापरणे आवश्यक असते. आपण गणितीय पद्धतीने स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये ज्या पद्धती वापरतो त्या अत्यंत उपयुक्त असतात. या व्याख्यानात विविध रचना, भार आणि तणाव याविषयावर महत्वपूर्ण माहिती देण्यात आली.
हे व्याख्यान फॅबटेक टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा श्रीमती नीलवर्णा बिरासाहेब रूपनर, उपाध्यक्ष भाऊसाहेब रूपनर, सचिव डॉ. अमित रूपनर, कार्यकारी संचालक दिनेश रूपनर, इस्टेट डायरेक्टर डॉ. संजय आदाटे, व्यवस्थापक प्रतिनिधी प्रा. प्राजक्ता रूपनर, प्राचार्य डॉ. रविंद्र शेंडगे, उपप्राचार्या डॉ. विद्याराणी क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले होते.
हे व्याख्यान यशस्वी करण्यासाठी स्थापत्य अभियांञिकी विभाग प्रमुख प्रा. शिवानंद माळी सह विभागातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.