विविध क्षेत्रातील पुरस्कारामुळे आणखी जोमाने काम करण्याची उर्जा निर्माण मिळते :-वामनराव माने
पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
कै.आप्पासाहेब चव्हाण स्मृती सामाजिक पर्यावरण पुरस्कार करकंब येथील करकंब गावच्या लेकीचं झाड अभियान टीमचे संंकल्पक ज्ञानेश्वर दुधाणे यांना वामनराव माने (पं.स.पंढरपूर माजी सभापती) यांचे शुभहस्ते आणि पंडीतराव देशमुख, (सभापती कृषी)हरिदादा गायकवाड,मा.जि.प.सदस्य सुभाष माने. निशिकांत परचंडराव मुख्याधिकारी या मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.सामाजिक, शैक्षणिक व साहित्यिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तिंना प्रत्येक वर्षी रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येते.
यावेळी करकंब गावामध्ये वृक्ष संवर्धन चळवळीच काम गेल्या तीन वर्षापासून अतिशय महत्त्वपूर्ण आणि सातत्यपूर्ण सुरू असून या कामाच्या योगदानामुळे ज्ञानेश्वर दुधाणे यांना पर्यावरण सामाजिक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले तसेच साहित्यामध्ये रेणुका बुधाराम तर शैक्षणिक क्षेत्रात पांडुरंग शिंदे यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.तसेच विविध शाळांमधील गुणवंत विद्यार्थी विद्यार्थिनी ना प्रेरणादायी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर पालक शिक्षक मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.
यावेळी कार्यक्रमाचे स्वागत मंदार केसकर तर प्रास्ताविक प्रताप चव्हाण यांनी करत कार्यक्रमाचे सुंदर सुत्रसंचलन सचिन लादे.ज्ञानेश्वर मोरे आणि देशमुख सर यांनी करत आभार सचिन यांनी मानले.आयोजक अमरसिंह चव्हाण,अमोल चव्हाण,प्रताप चव्हाण सर.आणि मित्रपरिवार यांनी अतिशय अनमोल परिश्रम घेत शेवटी सुरुची भोजन देऊन कार्यक्रम यशस्वी केला.