पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
अ.भा. संत नामदेव क्षत्रिय एकसंघाच्या पदाधिकार्यांची निवड पंढरपूर येथे झालेल्या विचार विनिमय बैठकीप्रसंगी राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. महेश ढवळे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली. यामध्ये महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी पंढरपूर शिंपी समाजाचे अध्यक्ष गणेश उंडाळे व सचिवपदी विलास पोरे यांची निवड करण्यात आली.
पंढरपूर येथे अ.भा. संत नामदेव क्षत्रिय एकसंघाची बैठक नुकतीच पार पडली. यावेळी राज्यातील पदाधिकार्यांच्या निवडी जाहिर करण्यात आल्या. यावेळी सर्वश्री ह.भ.प. माधव महाराज नामदास, मुकुंद महाराज नामदास, ज्ञानेश्वर महाराज नामदास, निवृत्ती महाराज नामदास, केदार महाराज नामदास, केशवराज संस्थेचे सर्वेसर्वा व एकसंघाचे राष्ट्रीय सचिव रुपेश खांडके, संत नामदेव शिंपी समाज पंढरपूरचे उपाध्यक्ष संजय जवंजाळ, सचिव विलास पोरे, विश्वस्त राजेश धोकटे , महेश गानमोटे, सोलापूरचे धनंजय जवंजाळ, महेश रेळेकर अॅड. अजय तल्लार, मनोज भांडारकर, नंदकुमार कोसमतवार, अनिल गचके आदी उपस्थित होते.
तसेच प्रदेश उपाध्यक्ष म्हणून परळी वैजनाथचे कैलास धोकटे (मराठवाडा विभाग), युवराज सुतोने (नागपूर-विदर्भ विभाग), नटवरलाल टेलर-कल्याण (मुंबई विभाग), विजय माळवदे (कोकण विभाग), शितल माळवदे (महिला कार्यकारणी, कोकण विभाग), संतोष मुळे (पश्चिम महाराष्ट्र विभाग), पश्चिम महाराष्ट्र संघटक म्हणून खेमराज नामा तसेच जिल्हा प्रमुख म्हणून काकडे (कोल्हापूर), महेश रेळेकर (सोलापूर), अॅड. सागर मांढरे (पुणे शहर), सुनिल होमकर (पुणे ग्रामीण), गजेंद्र शिंपी (नंदुरबार), गणेश सोनवणे (धुळे), शरद सोनवणे (जळगाव) यासह इतर पदाधिकार्यांच्या निवडी करण्यात आल्या. निवड झालेल्या पदाधिकार्यांचा पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. महेश ढवळे म्हणाले, अ.भा. संत नामदेव क्षत्रिय एकसंघाच्या माध्यमातून देशातील, राज्यातील विखुरलेला विविध पोटजातीतील शिंपी समाज एकसंघ करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहे. शिंपी समाजातील बांधवांसाठी राज्य शासनाने संत नामदेव महाराज आर्थिक विकास महामंडळ स्थापन केले असून समाजाच्या विविध पोटजातीतील गोरगरीब, गरजू बांधवांना या महामंडळाच्या माध्यमातून आर्थिक लाभ मिळवून देण्यासाठी पदाधिकार्यांनी प्रयत्न करावेत. याबाबत समाज बांधवांमध्ये जनजागृती करावी, अशा सूचना केल्या.
पंढरपूर येथे राज्य शासनाच्यावतीने उभारण्यात येणार्या संत नामदेव महाराजांच्या स्मारकासाठी एकसंघाचे वेळोवेळी पाठपुरावा केला असून प्रशासकीय बाबींची पुर्तता झाली असून लवकरच स्मारकाचे काम सुरु होणार आहे. यावर्षी दि. 23 जुलै रोजी संत नामदेव महाराजांचा 675 वा संजिवन समाधी सोहळा पंढरपुरात मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येणार असून त्यानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. नुतन पदाधिकार्यांनी एकसंघाच्या माध्यमातून आपापसातील मतभेद दूर ठेवून समाजाच्या सर्वांगिण प्रगतीसाठी प्रयत्न करण्याचे आवाहन करून निवड झालेल्या सर्व पदाधिकार्यांचे अभिनंदन केले.
सदर बैठकीस महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यातून शिंपी समाजाचे पदाधिकारी व समाज बांधव, महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. बैठकीचे सुत्रसंचालन राजेश धोकटे सर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी यशस्वी करण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष प्रथमेश परांडकर, युवक संघटनेचे अध्यक्ष पै. शैलेश धट, केशवराज संस्थेचे सदस्य जयवंत कांबळे, पत्रकार प्रशांत माळवदे, निलेश धोकटे, प्रशांत काकडे, दत्ता चांडोले अक्षय महिंद्रकर कृष्णा जवंजाळ अनिल धट माऊली निकते प्रकाश मेटकर आदींनी परिश्रम घेतले.