पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
महाराष्ट्र राज्य परीक्षा मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या दहावी बोर्ड परीक्षेत पंढरपूर येथील विवेक वर्धिनी विद्यालयाचा सरासरी निकाल 88.%लागला आहे.या परीक्षेत 90% पेक्षा जास्त तेरा विद्यार्थ्यांनी यश मिळवले. या विद्यार्थ्यांचा प्रशालेत संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यामध्ये प्रथम कु. समीक्षा गाडेकर९७.८०%,द्वितीय.. कु. स्वप्नाली आराध्ये ९७.२०% तृतीय. कु.अक्षरा यादव ९७%. या यशस्वी विद्यार्थ्यांचा व ९०% पेक्षा जास्त मार्क मिळवलेल्या १३ विद्यार्थ्यांचा व पालकांचा सत्कार करण्यात आला.
या यशस्वी विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष डॉ. मदन क्षीरसागर, उपाध्यक्ष प्रा. शिवाजी वाघ, सचिव ॲड. वैभव टोमके, सहसचिव अजित नडगिरे,खजिनदार सलीम वडगावकर, आप्पासाहेब चोपडे, दिलीपआप्पा घाडगे, अनिरुद्ध सालविठ्ठल, सुनीता मोरे तसेच प्राचार्य डॉ. मुंढे यू. आर. पर्यवेक्षक पवार ए. ए. ,दराडे डी. एस.मुख्य लिपिक हनुमंत मोरे, तंत्र विभाग प्रमुख नानासाहेब देवकते, वसतिगृह अधीक्षक अमोल हुंगे, इयत्ता दहावीचे सर्व वर्ग शिक्षक व विषय शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या .यावेळी यशस्वी विद्यार्थी त्यांचे पालक उपस्थित होते.