सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
लायन्स इंन्टरनॅशनल अंतर्गत लायन्स क्लब ऑफ सोलापूर व्टिन सिटीला प्रांताचे लाडके प्रांतपाल एम जे एफ एडवकेट मल्लीनाथ पाटील यांची अधिकृत भेट संपन्न झाली. सुरुवातीस क्लबचे अध्यक्ष लायन ज्ञानेश्वर कुलकर्णी यांनी घंटानाद केले. कार्यक्रमाची सुरुवात दिपप्रज्वलनाने करण्यात आली. लायन मुकुंद जाधव यांनी ध्वजवंदन केले. क्लबचे संस्थापक अध्यक्ष यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत करून सत्कार केले.
यावेळी व्यासपीठावर प्रांतपाल लायन एम के पाटील प्रांताचे प्रथम महिला लायन महानंदा पाटील, लायन ज्ञानेश्वर कुलकर्णी, झोन चेअरमन लायन नंदिनी जाधव, सचिव लायन सोमशेखर भोगडे, खजिनदार लायन प्रभाकर जवळकर, प्रांतीय सचिव लायन डॉ. अभिजित जोशी, प्रांतीय खजिनदार लायन महेश नळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
तसेच प्रांतपाल महिना साजरा करण्यात आले. सचिवांचा अहवाल लायन सोमशेखर भोगडे,तर हिशोबाचा अहवाल लायन प्रभाकर जवळकर यांनी सादर केला. यावेळी एल सी आय एफ, डि जी फंण्ड प्रांतपाल यांच्या कडे देण्यात आला. प्रमुख पाहुण्यांची ओळख झोन चेअरमन लायन नंदिनी जाधव यांनी करून क्लबला शुभेच्छा दिल्या. प्रांतपाल लायन क्लबचे अध्यक्ष, सचिव, खजिनदार सर्व टीमचे कौतुक करून क्लबला शुभेच्छा दिल्या.प्रांतपाल यांच्या कडून प्रमाणपत्र आणि लायन्स पिन, झोन चेअरमन लायन नंदिनी जाधव रिजन चेअरमन यांनी दिलेले रिजन बेस्ट झोन चेअरमन पुरस्कार, रिजन लायन सोमशेखर भोगडे बेस्ट सचिव पुरस्कार प्रांतपाल यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आला.
यावेळी इतर क्लबचे अध्यक्ष लायन ज्ञानेश्वर कुलकर्णी, प्रांतपाल लायन mjf MK पाटील, प्रांतच्या पहिल्या महिला महानंदा पाटील, प्रांत सेक्रेटरी लायन अभिजीत जोशी, प्रान्त खजिनदार लायन महेश नळे,प्रांतचे सर्वे सर्वा लायन गंगाप्रसाद बंडेवार,लायन श्रीपाद कुलकर्णी, डिस्ट्रिक्ट चेअरमन प्रांतपाल महिना लायन महिबूब शेख, झोन चेअरमन, लायन किरण कुलकर्णी, झोन चेअरमन लायन विठ्ठल सारंगी, संस्थापक अध्यक्ष लायन नागेश बुगड़े, ला ममता बुगड़े, ला मुकुंद जाधव, ला सागर पुकाळे,लायन कृष्णा चंडक, एम जे एफ ला डॉ राहुल चंडक, अध्यक्ष ला शलाका कुलकर्णी, सचिव ला सुधीर माळशेट्टी अक्कलकोट, ला प्रभाकर जवळकर उपस्थित होते.
यावेळी आभार सहसचिव लायन राजेश परसगौड यांनी केले तर सुत्रसंचलन एम.जे.एफ लायन ममता बुगडे, लायन सागर पुकाळे यांनी केले.