अकलूज प्रतिनिधी तेज न्यूज
अनेक नागरीकांना महागडे उपचार करणे शक्य होत नाही. त्यामुळे उपचार आणि औषधांच्या वाढलेल्या खर्चावर आरोग्य विमा हा एकमेव ऊत्तम पर्याय असल्याचे मत प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ. एम. के. इनामदार यांनी व्यक्त केले.
माळशिरस तालुका मराठी पत्रकार संघ आणि अश्विनी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने संग्रामनगर- अकलूज येथील अश्विनी हॉस्पिटल मध्ये डॉक्टर एम.के.इनामदार आणि डॉक्टर अनिकेत इनामदार यांनी माळशिरस तालुक्यातील पत्रकारांची मोफत आरोग्य तपासणी करताना ते बोलत होते.
याप्रसंगी डॉ. अनिकेत एम्. इनामदार हे प्रामुख्याने उपस्थित होते. प्रारंभी पत्रकार संघाच्या वतीने डॉक्टर एम के इनामदार आणि डॉक्टर अनिकेत एम इनामदार आणि अश्विनी हॉस्पिटल मधील कर्मचारी यांचा सन्मान करण्यात आला.
या मोफत आरोग्य शिबिरामध्ये रक्त, ई.सी.जी. रक्तातील साखर तपासणी करण्यात आली.तसेच गरज भासलेल्या पत्रकार बांधवांची इको तपासणी व एक्स -रे तपासणी करण्यात आली.
आरोग्य शिबीर यशस्वी करण्यासाठी अश्विनी हॉस्पिटल मधील राहुल बोंडगे, नितिन तुरुकणडोनी, पांडुरंग अनपट, मयुरी राऊत-काटे, साजिद शेख, रोहित इंगळे, धनाजी नाईकनवरे, प्रतिक्षा कुलकर्णी, मंगेश कुलकर्णी, सागर थोरात, चंद्रसेन बुरंगे इत्यादींनी परीश्रम घेतले.