पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
एस. के. एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी, पंढरपूर येथे १५ मार्च २०२५ रोजी उद्योजक दिनानिमित्त व्यवसाय धोरण आणि नवीन उदयोग उपक्रम विषयक सत्रांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन अभियांत्रिकी महाविद्यालयातील उद्योजकता विकास कक्ष (EDC) आणि इनोव्हेशन कौन्सिल (IIC) यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
1. आयडिया जनरेशन आणि स्टार्टअप निर्मिती (वधवानी फाउंडेशन प्लॅटफॉर्मवर)- सकाळी ९:०० वाजता, प्रमुख वक्ते: प्रा. ए. एस. कुलकर्णी (EDC सेल-इन चार्ज) यांनी या सत्रात स्टार्टअप कल्पना कशा तयार करायच्या, त्याचे योग्य सादरीकरण आणि वधवानी फाउंडेशनच्या माध्यमातून संधी यावर सखोल मार्गदर्शन केले.
2. जागतिक उद्योजक दिन (World Entrepreneur Day) उत्सव : दुपारी १:०० वाजता, प्रमुख वक्ते: डॉ. बी. एस. गंधारे यांनी या सत्रात उद्योजकतेचे महत्त्व, नवीन व्यवसाय संधी आणि भारतीय अर्थव्यवस्थेतील उद्योजकांचा वाटा याबद्दल चर्चा झाले व विद्यार्थ्यांना उद्योजक होण्यासाठी मार्गदर्शन केले व विविध उदाहरणे देऊन त्यांना माहिती दिली.
3. बिझनेस कॅनव्हास मॉडेल : दुपारी २:०० वाजता, प्रमुख वक्ते: डॉ. एस. जी. कुलकर्णी ( उपप्राचार्य आणि IIC अध्यक्ष ) यांनी या सत्रात व्यवसाय संकल्पना, मॉडेलिंग आणि व्यावसायिक धोरणे कशा प्रकारे आखायची यावर मार्गदर्शन केले व नवीन उद्योजक कसे घडतात व व बिझनेस कॅनव्हास मॉडेल याबद्दल सखोल मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले.
या विशेष उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना स्टार्टअप आणि उद्योजकता क्षेत्रातील तज्ञांचे मार्गदर्शन मिळणार आहे. एसकेएन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सतत नाविन्यपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आधुनिक उद्योजकता कौशल्य विकसित करण्यास मदत करत आहे या कार्यक्रमासाठी मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनियरींग, इलेक्ट्रॉनिक टेली कम्युनिकेशन या विभागातील 100 हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग होता.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रा. अतुल कुलकर्णी, प्रा.लक्ष्मीकांत जोशी, प्रा.महेश झाडे, प्रा.मनोज कोळी, प्रा. प्रदीप व्यवहारे यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.