पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी, पंढरपूर येथील संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी विभागात "एआय इन रोबोटिक्स अँड ऑटोनॉमस सिस्टिम्स" या विषयावर दिनांक 25 मार्च 2025 रोजी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य कैलाश करांडे यांनी दिली.
या व्याख्यानासाठी श्री. रुपेश रणवरे (नॉलेज बेस कन्सल्टंट - टेक्निकल, रिझुमेक्स, पुणे) यांना प्रमुख वक्ते म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. श्री.रुपेश रणवरे यांचा संगणक विभागाचे विभाग प्रमुख डॉ. एस. व्ही. पिंगळे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी श्री. रणवरे यांनी रोबोटिक्स आणि स्वायत्त प्रणालींमध्ये एआयच्या भूमिका, संधी आणि तांत्रिक दृष्टिकोन याबद्दल सखोल माहिती दिली. विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या विषयावरील महत्त्वपूर्ण ज्ञान मिळवले. सदरील कार्यक्रमासाठी द्वितीय वर्षातील 75 हून अधिक विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मयुरी कुलकर्णी हिने केले तर आभार प्रदर्शन प्रा. शाम भिमदे यांनी केले.
या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. जे. करांडे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.