पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
आज दिनांक २९ मार्च २०२५ रोजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले. तसेच त्यावेळी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या जतन व संवर्धनाचे काम चालु आहे त्याकामाची पहाणी केली, तसेच कामाचा आढावा घेतला. त्यावेळी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री , ग्रामविकास व पंचायतराज विभाग मंत्री जयकुमार गोरे उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री महोदयांचा समितीचे वतीने सह अध्यक्ष ह.भ.प. गहीनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तर पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा सत्कार मंदिरे समितीचे सदस्य व शिवसेना जिल्हाप्रमुख पंढरपूर विभाग संभाजी शिंदे यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा उपरणे व दैनंदिनी देवून सत्कार करण्यात आला.
त्यावेळी मंदिरे समिती सदस्या श्रीमती शकुंतला नडगीरे, सदस्या माधवी निगडे, आ. समाधान अवताडे, आ. गोपीचंद पडळकर, आ. अभिजीत पाटील, आ. बाबासाहेब देशमुख, आ. सचिन कल्याणशेट्टी, व्यवस्थापक मनोज श्रोत्री, प्रणव परिचारक व मंदिरे समिती कर्मचारी उपस्थित होते.