भाळवणी प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथे क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी 51 रक्तदात्यांनी रक्तदान केले.
या रक्तदान शिबिराचे उद्घाटन श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती, पंढरपूरचे सदस्य तथा उबाठा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी संभाजी शिंदे म्हणाले की राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या रक्तदान शिबिरातून गरजू रुग्णांना रक्ताची उपलब्धता व्हावी, तसेच युवकांमध्ये सामाजिक सेवेची भावना निर्माण व्हावी, हा संदेश देण्यात आला.
यावेळी उमेश चव्हाण,शिक्षक आबासाहेब जाधव आकाश सावंत, गंगाधर चव्हाण, प्रतीक चव्हाण, वैभव इंगळे, संदीप चव्हाण, सचिन सावंत, दिलीप भोसले, धनाजी गायकवाड, बंटी सावंत, संजय केसकर, विक्रम खंदारे वसीम इनामदार कैन्हया पवार आकाश शिंदे हेमंत कुचेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

