पंढरपूर प्रतिनिधी नंदकुमार देशपांडे तेज न्यूज
पंढरपूर अधिवक्ता संघ पंढरपूर व तालुका विधी सेवा समिती पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमानाने कायदेविषयक शिबिर दिनांक 04/ 03/ 2025 रोजी दुपारी 2 वाजता "कर्मयोगी विद्यानिकेतन" प्रशाला पंढरपूर येथे पार पडले.
या शिबिरामध्ये 'बेटी बचाव बेटी पडाव' व "POCSO (Protection of Children from Sexual Offence Act 2012" याबद्दल सखोल असे कायदेशीर मार्गदर्शन करण्यात आले.यामध्ये मान्यवरांचे स्वागत प्रशालेचे मुख्याध्यापिका प्रियदर्शनी सरदेसाई यांनी केले.
यामध्ये अध्यक्ष राजेश चौगुले यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली यामध्ये त्यांनी विद्यार्थिनींना उच्च शिक्षण घेण्याचे तसेच स्पेस टेक्नॉलॉजी शिक्षण घेऊन अंतराळवीर होण्याचे आवाहन केले, सचिव अभयसिंह देशमुख यांनी "महिलांची कायदेशीर हक्क व अधिकार" बद्दल सखोल असे मार्गदर्शन केले, सदस्य गणेश चव्हाण यांनी International Human Right Day याबद्दल माहिती. तसेच एडवोकेट अर्चना कुलकर्णी यांनी भारतीय राज्यघटनेमधील विद्यार्थिनीचे शिक्षणाचे हक्क आणि अधिकार याबद्दल मार्गदर्शन केले तसेच अँड वर्षा हिरणवाले यांनी बेटी बचाव बेटी पढाव याबद्दल मार्गदर्शन केले.दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर श्रीमती पाखले यांनी विद्यार्थिनींना कायदा विद्यार्थिनीचे हक्क अधिकार तसेच कोणत्याही प्रकारचा अन्याय झाला तरी त्याला वाचा फोडून अन्याय दूर करण्यासाठी कोठे दाद मागायची त्याबाबत कायद्यातील तरतुदी तसेच POSCO कायद्याबद्दल सखोल मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन उपाध्यक्ष महेश कसबे यांनी केले या कार्यक्रमाला ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार देशपांडे तसेच माजी मुख्याध्यापक सुनील यारगट्टीकर आदी उपस्थित होते.