भाळवणी प्रतिनिधी तेज न्यूज
जय भवानी पाणी वापर संस्थेची मागील थकबाकी पैकी दोन लाख पन्नास हजार तीनशे एकाहत्तर (२,५०,३७१) रुपयांचा भरणा संस्थेचे संचालक संभाजी शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी उपसरपंच नितीन शिंदे,गणपत गवळी,महेश शिंदे, प्रशांत माळवदे,शहाजहान शेख, मुसा शेख, निळकंठ गवळी,शिवाजी लोखंडे,दादा लोखंडे,शफी शेख,देविदास लिंगे आदि शेतकरी उपस्थित होते.
तसेच पाटबंधारे कार्यालय मधील बीटचे अधिकारी मोरे यांची दारूबंदी अधिकारी म्हणून निवड झाल्याबद्दल सत्कार जय भवानी पाणी वापर संस्थेमार्फत करण्यात आला. जय भवानी पाणी वापर संस्थेचे सचिव नीलकंठ चंद्रकांत गवळी यांच्या वैयक्तिक अडचणीमुळे सचिव पदी काम करण्यास अडचण येत असल्याकारणाने गवळी यांनी सचिव पदाचा राजीनामा दिला असल्याने त्यांचा निरोपपर सत्कार संस्थेमार्फत करण्यात आला. तसेच संस्थेचे नूतन सचिव बाळासाहेब कापसे यांचा ही सत्कार संस्थेमार्फत करण्यात आला. संस्थेमार्फत इरिगेशनच्या इतर अधिकाऱ्यांचा ही सन्मान करण्यात आला.
यावेळी संभाजी शिंदे म्हणाले की सर्व शेतकरी सभासद यांना विश्वासात घेऊन पाटबंधारे कार्यालयाची थकबाकी जमा केलेली आहे. शेतकरी बांधवांनी योग्य प्रमाणात पाण्याचा वापर करून वेळोवेळी पाणीपट्टी तात्काळ जमा करावी. म्हणजे आपल्या शेतीस आवश्यक त्या प्रमाणात पाणी उपलब्ध होईल. संस्थेच्या कार्यास पाटबंधारे विभागाने ही यापुढे सहकार्य करावे असे आवाहन शिंदे यांनी केले.
यावेळी रामचंद्र सावंत यांनी बोलताना सांगितले की संस्थेची राहिलेली थकबाकी ही येत्या एक-दोन आवर्तनामध्ये आपण योग्य नियोजनाने व पारदर्शकपणे कारभार चालवून लवकर संस्था कर्जमुक्ती करून आपल्या सर्व सभासदांच्या सहकार्यातून बाहेर काढू असा विश्वास मी आमच्या मॅनेजमेंटच्या सर्व सभासदांच्या वतीने देऊ इच्छितो. असे सावंत म्हणाले.यावेळी अधिकारी ,शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.