पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
आर्चरी असोसिएशन ऑफ इंडिया आयोजित 14 वी मिनी सब ज्युनिअर ( वयोगट 15 वर्षे खालील) राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धा गुंटूर ( आंध्रप्रदेश) येथे पार पडली.
या स्पर्धेमध्ये कुमार अर्णव माणिक मासाळ याने सांघिक रौप्य पदक मिळविले. वैयक्तिक स्कोअरिंग प्रकारात 720 पैकी 694 गुण मिळवून 7 वी रँक मिळविली तर वैयक्तिक एलिमेनेशन प्रकारात उपांत्यपूर्व फेरीत 1 गुणाने त्याचा पराभव झाला. त्याची ही पहिलीच राष्ट्रीय स्पर्धा होती. त्याने पंढरपूर येथील AJ आर्चरी ॲकडमीचे प्रशिक्षक सागर सुर्वे यांच्या मार्गदर्शना खाली धनुर्विद्येचे प्राथमिक धडे गिरविले.
तो सध्या दृष्टी आर्चरी ॲकडमी , सातारा येथे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक प्रविण सावंत व शिरिष ननवरे यांच्या मार्गदर्शना खाली धनुर्विद्येचे प्रशिक्षण घेत आहे. दृष्टी आर्चरीचे अध्यक्ष राजेश देशमुख , उपाध्यक्ष महेंद्र कदम व सचिव सायली सावंत यांनी अर्णवच्या या उज्ज्वल यशासाठी हार्दिक अभिनंदन केले.