भाळवणी प्रतिनिधी तेज न्यूज
जिल्हा परिषद सोलापूर अंतर्गत सन 2024-25 मध्ये घेण्यात आलेल्या प्रज्ञाशोध परीक्षेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भाळवणी मुली शाळेतील आदर्श विद्यार्थिनी कुमारी रचना पवन सातपुते हिने 200 पैकी 186 गुण मिळवून पंढरपूर तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकवला आहे व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भाळवणी मुले शाळेतील विद्यार्थी कुमार रत्नदीप सुनील गवळी याचा 180 गुण मिळवून पंढरपूर तालुक्यात द्वितीय क्रमांक मिळवला आहे.
भाळवणी शाळेने तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवून आपल्या शिष्यवृत्ती परीक्षेतील दैदीप्यमान यशाची परंपरा कायम राखली आहे याबाबत भाळवणी पंचक्रोशीत शाळेचे व शाळेतील विद्यार्थ्यांचे कौतुक केले जात आहे.
या यशस्वी विद्यार्थ्यांनचे शिवसेना जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे, पांडुरंग कारखानाचे संचालक भगवान चौगुले,सरपंच रणजीत जाधव, उपसरपंच नितीन शिंदे,उद्योजक विजय शिंदे ,तसेच शाळा व्यवस्थापन समिती भाळवणी मुली शाळेचे अध्यक्ष अमोल शिंदे, उपाध्यक्ष अश्विनी कुचेकर व सर्व सदस्य,शाळा व्यवस्थापन समिती भाळवणी मुले शाळेच्या अध्यक्षा जयश्री लोखंडे, उपाध्यक्ष आर के पवार व सर्व सदस्य ,शिक्षणप्रेमी नागरिक यांनी अभिनंदन केले आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांना वर्गशिक्षिका उषा कांबळे व प्रेमलता धोत्रे व दोन्ही शाळांचे मुख्याध्यापक सुरेश शिंदे व गायकवाड तसेच केंद्रप्रमुख रासकर व गटशिक्षणाधिकारी लिगाडे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.