पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि सौ. अमृता फडणवीस यांच्या शुभहस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा भक्तिमय वातावरणात संपन्न झाली.अशी माहिती नगराध्यक्षा डॉ. प्रणिताताई भालके यांनी तेज न्यूजशी बोलताना दिली.
या पवित्र सोहळ्यात पंढरपूर नगराध्यक्षा डॉ. प्रणिताताई भगिरथ भालके तसेच धाराशिव जिल्ह्यातील गौरगाव येथील शेतकरी दाम्पत्य बाबासाहेब माधव माने व प्रभावती बाबासाहेब माने यांना मानाचे वारकरी म्हणून महापूजेत सहभागी होण्याचा बहुमान लाभला.
श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या चरणी महाराष्ट्राच्या सुख-समृद्धी, शेतकऱ्यांचे कल्याण, वारकरी संप्रदायाचे मंगलमय भविष्य आणि सर्व जनतेच्या आरोग्य, आनंद व भरभराटीसाठी प्रार्थना करण्यात आली.असे भालके यांनी सांगितले.

