पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
" हेचि आम्हा करणे काम | बीज वाढवावे नाम || " या संतउक्ती प्रमाणे वारकरी संप्रदायातील संत विचाराचे मंथन व्हावे , वारकरी संघटन व्हावे, समाज मनाला स्थिरता मिळावी या हेतूने भाविक वारकरी मंडळ यांचे माध्यमातून श्री संत नामदेव महाराज 16 वे वंशज ह भ प माधव महाराज नामदास (पंढरपूर) यांच्या अध्यक्षतेखाली व सुधाकर इंगळे महाराज (राष्ट्रीय अध्यक्ष ) यांचे मार्गदर्शनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृती भवन, अंबिका मंदिर चौक, तहसील कार्यालय, सांगोला जि. सोलापूर येथे राज्यस्तरीय वारकरी संमेलन आयोजित करण्यात आले आहे.
दि.09-03-2025 (रविवार) रोजी स. 9.30 वा. ग्रंथ दिंडी - अंबिका मंदिर ते हॉल - स. 10.00 वा. कार्यक्रम उदघाटन होणार आहे.
यावेळी हभप निरंजननाथ योगीजी महाराज ( संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थान आळंदी - प्रमुख विश्वास्थ ) हे प्रथम सत्राचे अध्यक्ष असतील व प्रमुख अतिथी ह भ प श्रीगुरु गोपाळ अण्णा वासाकर महाराज ( वासाकर फड - पंढरपूर ) असतील तसेच प्रमुख उपस्थिती ह भ प भागवत चवरे महाराज ( राष्ट्रीय उपाध्यक्ष ) ह भ प अक्षय भोसले महाराज (प्रदेश अध्यक्ष अध्यात्मिक आघाडी शिवसेना ) आचार्य तुषार भोसले (प्रदेश अध्यक्ष अध्यात्मिक आघाडी भा ज पा ) मा. बाबासाहेब देशमुख आमदार, मा.समाधान दादा अवताडे आमदार, मा.दिपक (आबा) साळुंखे माजी आमदार, मा.शहाजी (बापू ) पाटील माजी आमदार, मा.चेतनसिंह केदार सावंत ( जिल्हाध्यक्ष भा ज पा ) , मा.राजा माने (संस्थापक अध्यक्ष- डिझिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र ), मा संतोष कणसे तहसीलदार सांगोला, डॉ .सुधीर गवळी मुख्याधिकारी सांगोला नगरपरिषद सांगोला, मा.भीमराव खणदाळे (पोलीस निरीक्षक, सांगोला ) हे असतील. तसेच दु. 2.00 वा. वारकरी मंडळ पदाधिकारी परिचय भेट, दु. 2.30 वा.महाराष्ट्रातील सर्व जिल्हाध्यक्ष व महिला पदाधिकारी मनोगत होऊन 4.00 वा समारोप व पसायदानाने सांगता करण्यात येणार आहे.
तरी सर्व वारकरी भाविकांनी उपस्थित रहावे असे आवाहन मा. सतीश भाऊ सावंत ( उपाध्यक्ष - डिझिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र ), जोतिराम चांगभले (प्रदेश अध्यक्ष ) यांनी पत्रकार परिषद मध्ये केले. तसेच ज्ञानेश्वर माऊली भगरे ( जिल्हा अध्यक्ष ), बिरा बंडगर महाराज (सह जिल्हा अध्यक्ष ) अखिल भाविक वारकरी मंडळ सर्व पदाधिकारी हे परिश्रम घेत आहेत.
या पत्रकार परिषदेसाठी बळीराम जांभळे (राष्ट्रीय सचिव), ज्ञानेश्वर माऊली भगरे (जिल्हाध्यक्ष - पंढरपूर विभाग ), महादेव दिवसे हे उपस्थित होते.