राग धनकोनी.हंसध्वनी मारुबिहाग.आणि तबलावादनाचा श्रवणीय कलाविष्कार
पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर तरंगणी सांस्कृतिक प्रतिष्ठान आरती साऊंड सिस्टिम मनमाडकर परिवार आणि नादब्रह्म कला फाउंडेशन करकंब यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवशीय पं. जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सवाची सांगता रसिक श्रोत्यांच्या उदंड प्रतिसादा मध्ये संपन्न झाली. सुरुवातीला प्रशांतराव परिचारक उमेशजी परिचारक अभेद अभिषेकी.भगवान भाऊ मनमाडकर ज्ञानेश्वर दुधाणे आदी सर्व मान्यवरांच्या वतीने दीप प्रज्वलन करण्यात आले.
त्यानंतर पहिल्या दिवशी अपर्णाताई केळकर यांनी राग धनकोनी अतिशय सुंदर सादर करत रंग ना डालो श्याम. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. आम्हा नकळे ज्ञान. अभंग सादर करत रसिकांना सुंदर मेजवानी दिली दुसऱ्या सत्रांमध्ये आंतरराष्ट्रीय किर्तीचे तबलावादक ओजस आदीया यांनी आपल्या तबलावादनाने पंढरपूरकर कला रसिक श्रोत्यांची मने जिंकली. पेशकार.कायदे .चक्रदार .परण गुरु मृदुंगनाथ जी यांनी अभ्यासपूर्ण केलेल्या मार्गदर्शनामुळे दर्जेदार तबलावादक पंढरपूरकर कलारसिक श्रोत्यांना ऐकायला मिळाले. त्यांना तितकीच सुंदर साथ संगत अमेय बिचू यांनी दिली. त्यानंतर दुसऱ्या दिवशीच्या प्रथम सत्रांमध्ये अमर ओक यांचे बासरी वादन संपन्न झाले.
त्यांनी राग हंसध्वनी सादर करत आलाप.जोड. झाला. सादर करत अधिक रंगत वाढवली बाजे रे मुरलीया बाजे. माझे माहेर पंढरी या दोन अभंगाने वातावरण भक्तीमय करत रसिकांना मंत्रमुग्ध केले त्यांना तितकीच सुंदर साथ तबला पांडुरंग पवार पखवाज कृष्णा साळुंखे यांनी दिली त्यानंतर पं. राजा काळे यांच्या गायनाला सुरुवात झाली त्याआधी नादब्रह्म कला फाउंडेशनच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या स्मरणिकेचे प्रकाशन योगी निरंजन नाथजी पं. राजा काळे वसंत मराठे ज्ञानेश्वर वीर यांच्या शुभहस्ते प्रकाशित करण्यात आली.
त्यानंतर पं. राजा काळे यांनी राग मारू बिहाग विलंबित तीनतालात सादर करत लगेच बंदिश सादर करत अभ्यास पूर्ण गायकीचं दर्शन घडवलं त्यानंतर बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल पंढरीचे सुख नाही त्रिभुवनी तुझी सेवा करीन मनोभावे अतिशय सुंदर अभंग सादर करत सर्वात या भैरवीने कार्यक्रमाची सांगता केली त्यांना तितकीच सुंदर साथसंगत पांडुरंग पवार हार्मोनियम उदय कुलकर्णी पखवाज ज्ञानेश्वर दुधाणे स्वर साथ अभेद अभिषेकी आणि शाम जोशी टाळ वैभव केंगार यांनी करत अधिक रंगत आणली कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन संकेत कुलकर्णी आणि आरती ताई मनमाडकर यांनी केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शुभांगी ताई मनमाडकर. धनंजय मनमाडकर. वैभव केंगार. माऊली खरात.गौरी अंमळनेरकर .माधुरी जोशी. पारुल परमार. स्वानंदी काणे. सुदर्शन कुंभार. रामेश्वर जाधव. यांनी अधिक परिश्रम घेतले.


