पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपुर गुन्हे प्रकटीकरण पथकास मिळालेल्या गोपनिय माहिती नुसार जुना दगडी पुलाजवळ नविन पुलाचे खाली गाळा क्र. ०३ मध्ये एक इसम संशयीतपणे वावरताना दिसला. त्यास पोलीस पथक पकडणेस जात असताना तो पळून जाणेचे तयारीत असताना त्यास पोलीसांनी गराडा घालुन जागीच पकडले. पकडलेले इसमास त्याचे नाव पत्ता विचारता त्याने आपले नाव लखन चंद्रकांत ननवरे वय ३५ वर्षे रा. आंबाबाई पटांगण, पंढरपूर ता. पंढरपूर जि. सोलापूर असे असलेचे सांगीतले. पकडलेल्या इसमाची अंगझडतीमध्ये कमरेचे उजव्या बाजूस एक लोखंडी देशी बनावटीचे एक पिस्टल मॅक्झीनसह मिळाले. पकडलेले इसमास पिस्टल वापरण्याचा परवाना बाबत विचारले असता त्याने नसल्याचे सांगीतल्याने त्यास पंढरपुर शहर पोलीस ठाणेस आणुन पंढरपुर शहर पोलीस ठाणे गु.र.नं. ११६/२०२५ भारतीय हत्यार कायदा १९५९ चे कलम ३ व २५ प्रमाणे व महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १३५ प्रमाणे फिर्याद दाखल केली आहे.
सदरची कामगीरी ही पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधिक्षक प्रितमकुमार यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी पंढरपूर विभाग डॉ. अर्जुन भोसले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पंढरपूर शहर पोलीस ठाणे विश्वजीत घोडके यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे, पोसई राजेश गोसावी, सपोफौ शरद कदम, सपोफौ कल्याण ढवणे, पोह ३९८ सिरमा गोडसे, पोह ३९६ सुरज हेंबाडे, पोह २२१ प्रसाद औटी, पोह १७८९ सचिन हॅबाडे, पोह १२५५ विठ्ठल विभुते, पोशि १२१६ शहाजी मंडले, पोशि २१९० समाधान माने, पोकॉ १५१३ बजरंग बिचुकले, पोकॉ १९०४ निलेश कांबळे तसेच सायबर शाखा सोलापुर ग्रामीणचे पोशि रतन जाधव यांनी केली आहे.