भाळवणी प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरद पवार पक्षाच्या तालुका अध्यक्ष राजश्री ताड यांच्या घरी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवजन्मोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला होता.
यावेळी महिलांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पाळणा हलवून पाळणा गीत गाऊन मोठ्या उत्साही वातावरणात हा सोहळा संपन्न झाला.
यावेळी सविता कापसे म्हणाल्या की, राजश्री ताड यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी पहिल्यांदाच महिलांनी एकत्रित येऊन छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी केली आहे याचा आम्हाला जास्त आनंद होत आहे.
यावेळी राजश्री ताड म्हणाल्या की छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती महिलांनी साजरी करावी या उद्देशाने मी जन्मोत्सव सोहळा आयोजित केला आहे. या कार्यक्रमास महिला मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्यामुळे यापुढेही कायम शिव जन्मोत्सव सोहळा मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात येणार असल्याचे राजश्री ताड यांनी सांगितले.
यावेळी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.