पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी येथील कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विभागात 'आयटी उद्योगात यशस्वी कसे व्हावे' या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून एन्झिग्मा सोल्युशन्स एलएलपीचे सीईओ आणि संस्थापक श्री. हिमांशू शाह यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या व्याख्यानात सॉफ्टवेअर क्षेत्रातील संधी, आवश्यक कौशल्ये, उद्योगातील सद्य स्थिती आणि भविष्यातील शक्यता याबाबत श्री. हिमांशू शाह यांनी विद्यार्थ्यांना मोलाची माहिती दिली. त्यांनी विशेषतः प्रोग्रामिंग कौशल्ये (पायथॉन, जावा, जावास्क्रिप्ट), वेब डेव्हलपमेंट, डेटा सायन्स, क्लाउड कंप्युटिंग, सायबर सिक्युरिटी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशिन लर्निंग, डेव्हऑप्स, मोबाईल अॅप डेव्हलपमेंट आणि सॉफ्टवेअर टेस्टिंग यासारख्या महत्त्वाच्या कौशल्यांवर भर दिला.
या कार्यक्रमाला कॉम्प्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंग विभागाच्या द्वितीय आणि तृतीय वर्षातील एकूण १५० विद्यार्थी उपस्थित होते.
सदरील कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विभागप्रमुख डॉ. एस. व्ही. पिंगळे तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाच्या शेवटी प्रा. एस. जी. लिंगे यांनी आभार प्रदर्शन केले.