पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
माघ शुद्ध जया एकादशीचा मुख्य सोहळा संपन्न होत असून, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर व दर्शन रांगेत भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे आणि सर्वत्र पुंडलिक वरदे हरी विठ्ठल असा जयघोष सुरू आहे.
मंदिर समितीमार्फत दर्शन रांगेत पिण्याचे पाणी, पत्रा शेड, बेरिकेटिंग, चांगली स्वच्छता व्यवस्था, सुरक्षा, चहा खिचडी वाटप व इतर अनुषंगिक पुरेशा प्रमाणात सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. या सोयी सुविधांचा आढावा घेतला.
दर्शन रांगेतील एक ही भाविक उपाशी राहू नये याची खबरदारी घेण्यात आली असून मागील वर्षाप्रमाणेच पत्रा शेड येथे अन्नछत्र सुरू करण्यात आले आहे. दर्शन रांगेतील मिळालेल्या सोयी सुविधा पाहून भाविक समाधान व्यक्त करीत आहेत आणि हीच आपल्या सेवेची पावती आहे. कर्तव्याची एक वारी पूर्णत्वास येत आहे......!
संभाजी शिंदे,
सदस्य श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर