कोळा प्रतिनिधी तेज न्यूज
गुरुवार दि- 06/02/2025 रोजी कोळा विद्यामंदिर ज्युनिअर कॉलेज कोळा येथे इयत्ता बारावी (कला व शास्त्र) विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी अध्यक्षीय मनोगतामध्ये प्राचार्य श्रीकांत लांडगे सर म्हणाले, विद्यार्थ्यांनी बोर्ड परीक्षेला आत्मविश्वासाने सामोरे जावे. यासाठी प्रामाणिक कष्ट आवश्यक आहे. तसेच विद्यार्थ्यांनी आपल्या अंगी नम्रता बाळगावी,आई वडीलांचा आदर करावा. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे उदाहरण देऊन विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण केला.
पर्यवेक्षक चारुदत्त जगताप यांनी आपल्या मनोगतात जिद्द,चिकाटी,आणि प्रामाणिक कष्ट घेतले तर यश नक्कीच मिळते. कॉलेज मध्ये मिळालेले संस्कार भविष्य काळात उपयोगी ठरतील. त्याचबरोबर अभ्यासामध्ये सातत्य ठेवा. यश तुमचेच आहे असे सांगितले.
विद्यार्थी मनोगतात कु. ऐश्वर्या कोळेकर, कु. रेणुका आलदर, कु. सोनाली आलदर, कु. शिवकन्या गोडसे व कु. नम्रता हातेकर यांनी कॉलेज विषयी आपल्या मनातील विचार प्रकट केले. शिक्षक मनोगतामध्ये प्रा.आनंदा आलदर , तसेच प्रा.सुनील माळी यांनी विचार व्यक्त केले.
प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा.तानाजी सरगर यांनी केले तर आभारप्रदर्शन प्रा.अमोल कोरे यांनी मानले.शेवटी विद्यार्थ्यांना अल्पोपहार देऊन कार्यक्रमाची सांगता झाली.