करकंब प्रतिनिधी तेज न्यूज
विविध क्षेत्रात सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या व्यक्तिंच्या शुभहस्ते शिवरायांच्या मुर्तींचे पुजन
आज छत्रपती राजे शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे श्रीमंत राजे छत्रपती शिवाजी महाराज मध्यवर्ती मंडळ थोरली वेस वतीने सकाळी ९:३० वाजता करकंब मधील योगामध्ये भारतात प्रथम आलेली अमृता सरगुले. एशियन तायक्वांडो आशिया खंडात प्रथम आलेली मानसी अशोक भोसले लेकीच झाड संकल्पक शिवश्री ज्ञानेश्वर दुधाणे प्रतिबिंब सामाजिक प्रतिष्ठान चे शिवश्री बाळासाहेब घाडगे.शिवप्रेमी शिवश्री भागवत पलंगे यांचे शुभहस्ते आणि अध्यक्ष शिवश्री विवेक (नाना)शिंगटे.उपाध्यक्ष शिवश्री बंडू खपाले व इतर पदाधिकारी यांच्या उपस्थितीत आई जिजामाता छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या मुर्तींचे व प्रतिमेचे पूजन करण्यात आले.तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सातत्यपूर्ण कामामुळे करकंब गावच्या नावलौकिकात भर पडत आहे.
त्यामुळे अमृता सरगुले.मानसी भोसले.ज्ञानेश्वर दुधाणे.बाळासाहेब घाडगे.आणि भागवत पलंगे यांचा मान्यवरांच्या शुभहस्ते सचित्र शिवचरित्र भेट देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी करकंब गावचे पदाधिकारी शिवप्रेमी नागरिक आणि करकंब गावच्या लेकीचं झाड अभियान टीम व जागर स्वच्छता अभियान टीम सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.