सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
परसबाग सोलापूर या पर्यावरणीय व्यासपीठाच्यावतीनें रविवार दिनांक १६ रोजी सायंकाळी ठीक सहा वाजता डफरिन चौक परिसरात सोलापूर शहरातील पर्यावरण प्रेमींसाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
परसबाग सोलापूर या या स्वयंसेवी पर्यावरणीय व्यासपीठाची स्वतःची अशी कार्य संकल्पना आहे.त्यानुसार गेल्या पाच वर्षांपासुन विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत.सोलापूरच्या सध्याच्या पर्यावरणाचा विचार करता ही बैठक महत्वपूर्ण आहे.तरी पर्यावरण क्षेत्रात काम करु इच्छिणारे महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनी,युवक-युवती, गृहिणी,ज्येष्ठ नागरीक अशा सर्व स्तरातील पर्यावरणप्रेमी नागरीक या बैठकीमध्ये सहभागी होऊ शकतात.
या बैठकीत सोलापूर शहरातील पर्यावरणीय गरजां संदर्भात विचार विनीमय करण्यात येणार आहे.तरी सोलापूर शहरातील पर्यावरण प्रेमी स्वयंसेवी नागरिक आणि पर्यावरण प्रेमींनी या बैठकीस वेळेवर उपस्थित रहावे.अधिक माहितीसाठी ९९६०००८२२० यावर संपर्क साधावा असे परसबाग सोलापूर च्यावतीने कळवण्यात आले आहे.
नारायण पाटील संस्थापक ९९६०००८२२०