पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर अर्बन बँक सभागृह, शाखा-खवा बाजार येथे बॉण्ड पंढरपूर ब्राह्मण संघटनच्या वर्धापनदिनानिमित्त पुरस्कार वितरण सोहळा बॉण्डचे संस्थापक जितेंद्र कुलकर्णी व संस्थापिका उत्कर्षा कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवार दि. 15 फेब्रुवारी 2025 रोजी सायंकाळी 4 ते 7 या वेळेत सम्पन्न होणार आहे.
ब्राह्मण समाजाप्रती आपण करत असलेल्या कार्याची दखल घेऊन बॉण्ड ब्राह्मण संघटन परिवाराच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त ब्राह्मण समाजाच्या उन्नतीसाठी "आपणास बॉण्ड समाजरत्न व बॉण्ड उद्योजक " पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे.
समाजरत्न पुरस्कार 2025
प.पू श्री मदन महाराज हरिदास
श्री . संदीप वांजपे
श्री .धनंजय मांडके
श्री .प्रशात चौधरी
यांना प्रदान करण्यात येणार आहे. याचबरोबर बॉण्ड पंढरपूर संघटन साठी महत्वपूर्ण सहकार्य व पंढरपुरातील प्रथितयश उद्योजक -
श्री. आनंद तेंडुलकर,
श्री.नारायण बडवे,
श्री. प्रसाद खाडिलकर,
श्री. रमाकांत दुनाखे,
श्री. हृषीकेश उत्पात,
श्री. श्रीधर आंधळगावकर,
श्री. पांडुरंग हरिदास,
श्री. आदित्य जोशी,
श्री. रामकृष्ण बिडकर,
श्री. चिंतामणी दामोदरे.
यांना बॉण्ड उद्योजक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. तरी सर्व समाज बांधवांनी या कार्यक्रमासाठी अवश्य उपस्थित रहावे असे आवाहन समस्त बॉण्ड परिवाराचे वतीने करण्यात येत आहे.