महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब तसेच कॅबिनेट मंत्री भारत शेठ गोगावले यांचे मनापासून आभार
मोहोळ प्रतिनिधी तेज न्यूज
आष्टी टप्पा क्रमांक दोन चा लढा जिंकला पोखरापूर खवणी सारोळे योजना आज असून पासून सुरू झाली त्यावेळी उपस्थित शिवसेना जिल्हाप्रमुख चरणराज चवरे,शिवसेनेचे नेते रमेश बारसकर, पोखरापूर गावचे उपसरपंच आशीष (बापू) आगलावे, अण्णा शिंदे, खवणी सरपंच महादेव यमगर, किरण वाघमारे , महादेव नरुटे ,अतुल लेंगरे ,राहुल लेंगरे, तानाजी सावंत प्रशांत सातपुते सर अतुल शिरसागर लखन पवार निलेश जरग आधी मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते तसेच पोखरापूर खावणी सारोळे गावचे शेतकरी बांधव उपस्थित होते.
शेतकऱ्यांच्या डोळ्यातील आनंदाश्रू पाहून मन भारावून गेले खरंतर आज सारोळे खवणी पोखरापूर या भागातील लोकांना अष्टमक टपा क्रमांक दोन मधील पाणी आल्यामुळे अतिशय फायदा होणार आहे मला सुद्धा खूप आनंद झाला की आयुष्यात जन्माला येऊन काहीतरी माझ्या कष्टकरी शेतकऱ्यांसाठी करू शकलो आम्ही 2018 पासून या योजनेला चालू करण्यासाठी प्रयत्न करत होतो अखेर आज यश आले आणि शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरच्या आनंद पाहून मनाला समाधान वाटले इथून पुढल्या काळात देखील मोहोळ तालुक्यातील सर्वसामान्य कष्टकरी शेतकऱ्यांसाठी प्रमाणिकपणे काम करत राहणार
महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब कॅबिनेट मंत्री भरत शेठ गोगावले नारायण जोशी साहेब चौरे साहेब यांनी अतिशय सहकार्य केल्याबद्दल यांचं मनापासून खूप खूप आभार.
शिवसेना जिल्हाप्रमुख नियोजन समिती सदस्य सोलापूर चरणराज चवरे