जोगेश्वरी पूर्व गणेश हिरवे
जोगेश्वरी पूर्व इस्माईल युसुफ कॉलेज मध्ये दोन आधार कार्ड बनविणारी केंद्र होती त्यापैकी एक केंद्र मागील सात आठ महिन्यांपासून बंद आहे.परिणामी दुसऱ्या केंद्रावर आधार कार्ड काढणाऱ्या नागरिकांचा गर्दी वाढल्याने त्यांचा तासनतास खोळंबा होत आहे.
पूर्वीचे बंद करण्यात आलेले केंद्र पुन्हा सुरू करण्यात यावे असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे.आधार कार्ड सरकारी दस्तऐवज असल्याने विद्यार्थी पासून सर्वांनाच ते विविध कामांसाठी लागत असते.आजही शाळेत जाणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांचे आधार कार्ड नसल्याने त्यांचे सरल प्रमाणित नोंद झालेली नसल्याने ते ग्राह्य दाखविण्यात येत नसून कागदोपत्री अपात्र ठरविण्यात येत असल्याने याचा फटका शिक्षकांना अतिरिक्त ठरविण्यासाठी बसत आहे.
विविध शाळा कॉलेज मध्ये आधार केंद्र जर सुरू केली तर विद्यार्थ्याना तिथल्या तिथे कार्ड काढण्यास मदत होईल .शासनाने आणि शिक्षण खात्याने या कमी पुढाकार घ्यायला हवा.