पुणे प्रतिनिधी तेज न्यूज
आज बुधवार दिनांक ८ जानेवारी रोजी राज्यसभेचे खासदार माननीय मेधाताई कुलकर्णी यांची त्यांचे निवासस्थानी नामदेव शिंपी समाज युवक संघाचे अध्यक्ष सिद्धेश हिरवे, मंगेश मांढरे, अतुलजी गीते, मयूर हिरवे व सहकारी यांनी सदिच्छा भेट घेतली यावेळी विविध मागण्यांचे निवेदन माननीय मेधाताई कुलकर्णी यांना देण्यात आले. यावेळी त्यांनी सर्व विषय समजावून घेऊन त्यावरती चर्चा केली व त्या विषयानुसार राज्य शासन व केंद्र शासनाकडे संबंधित विभागात पत्रव्यवहार करून पाठपुरावा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले व समाजाच्या सर्व बाबी पूर्ण सहकार्य राहील असे त्यांनी सांगितले यावेळी फोन द्वारे संत नामदेव महाराज यांचे १७ वे वंशज ह. भ.प. श्री निवृत्ती महाराज नामदास यांनी संवाद साधला सन २०२५ हे वर्ष श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांचे शष्ठ शतकोत्तर अमृत महोत्सवी ६७५ वे समाधी वर्ष असल्याने यासंबंधीच्या अनेक प्रलंबित मागण्या या निमित्ताने पूर्ण व्हाव्यात असे निवेदन त्यांना देण्यात आले त्याप्रमाणे महाराष्ट्र शासन तसेच संत नामदेवांचे भारतभर कार्य पाहता केंद्र शासनाकडे या मागण्यांसाठी पात्रद्वारे आपण पाठपुरावा करून त्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन मेधाताई यांनी दिले.
यावेळी मांडलेल्या महत्त्वपूर्ण मागण्या पुढील प्रमाणे आहेत
१). पंढरपूर पालखी महामार्गावर संत नामदेव महाराज यांच्या जीवन कार्यावर आधारित चित्रशिल्प उभारणे बाबत
२).संत नामदेव महाराज यांना राष्ट्रसंत म्हणून घोषित करावे.
३).पंढरपूर विठ्ठलाचे मुख्य दर्शन रांग संत नामदेव महाराज यांच्या समाधीस्थळापासून करण्यात यावी.
४).संत नामदेव महाराज समाधी स्थळाजवळ महाराष्ट्र शासनातर्फे नामदेव महाराज संत जनाबाई व नामदेव महाराज परिवार यांच्या कार्य. विषयी थोडक्यात माहिती दर्शवणारा फलक शासनाचे वतीने लावण्यात यावा.
५).संत नामदेव महाराज व केशवराज मंदिर पंढरपूर हे नामदेव महाराज महाराजांचे जन्म ठिकाण व निवासस्थान असल्याची शिंपी समाजासह वारकरी संप्रदाय धारणा आहे तसा उल्लेख करणारा फलक मुख्य रस्त्यावरती महाराष्ट्र शासनातर्फे तसेच नगर परिषदे तर्फे लावण्यात यावा.
६).नामदेव गाथा या ग्रंथाचे प्रकाशन सध्या चालू नसून महाराष्ट्र शासनाच्या मुद्रणालयातून पुन्हा छापण्यात यावेत आणि अल्प दरात सदर ग्रंथ सर्वांना उपलब्ध व्हावा.
७).संत तुकाराम महाराज गाथा मंदिराच्या धर्तीवर संत नामदेव महाराज गाथा मंदिर उभारण्यात यावे.
८).पंढरपूर ते घुमान यादरम्यान संत नामदेव महाराज एकात्मता एक्सप्रेस रेल्वे सेवा सुरू करणे बाबत
९).पनवेल येथील गोवा मुक्ती संग्रामाचे प्रणेते हुतात्मा हिरवे गुरुजी यांचे नाव पनवेल येथील सार्वजनिक महत्त्वाच्या ठिकाणी देऊन यांच्या कार्याचा गौरव करावा
१०)संत नामदेव महाराज समाधी सोहळ्याचे ६७५ वे वर्ष असल्याने सार्वजनिक रस्ते, पूल, चौक, उद्याने तसेच शासकीय योजना यांना संत नामदेव महाराजांचे नाव देण्याचा प्रयत्न करावा.
११)संत नामदेव महाराज समाधी सोहळा शासकीय स्तरावरती साजरा व्हावा आणि त्यांचे कार्य दर्शवणारे काही महत्त्वपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे.
१२). ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा करिता प्रतिवर्षी पंढरपूर ते आळंदी संत नामदेव महाराज यांची पालखी हजारो वारकऱ्यांसह आळंदी मध्ये येत असते तरी या वारीमध्ये सहभागी वारकऱ्यांच्या व्यवस्थेसाठी कायमस्वरूपी जागेची उपलब्धता व्हावी.
अशा विविध स्वरूपाच्या मागण्यांची निवेदन नागरिक व समाज बांधवांच्या उपस्थिती त्यांना यावेळी देण्यात आले.अशी माहिती प्रसिद्धी विभाग-नामदेव शिंपी समाज युवक संघ, महाराष्ट्र यांनी दिली आहे.