पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
समस्त शिंपी समाजाचे आराध्य दैवत वारकरी संप्रदायाचे आद्य प्रचारक व राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा स्मारकाचा मार्ग लवकरच आता मोकळा होणार असून याविषयी सोलापूर जिल्हाधिकारी यांच्याशी दिनांक 17 जानेवारी रोजी दुपारी 4 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर येथे सविस्तर चर्चा मीटिंग आयोजित करण्यात आली होती या बैठकीमध्ये संत नामदेव महाराजांच्या सविस्तर माहिती याप्रसंगी दिली.
यावेळी अखिल भारतीय संत नामदेव क्षत्रिय एक संघाचे अध्यक्ष महेश ढवळे, पंढरपूर समाजाध्यक्ष गणेश उंडाळे, केशवराज संस्थेचे अध्यक्ष रुपेश खांडके व समाज बांधव उपस्थित होते.
सदर कुमार आशीर्वाद जिल्हाधिकारी साहेबांना नामदास परिवाराच्या वतीने जुलै 2025 मध्ये संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या 675 व्या संजीवन समाधी सोहळ्याचे आमंत्रणही दिले व शासनाने हा कार्यक्रम भव्य प्रमाणात शासकीय स्तरावर साजरा करावा असेही त्यांना विनंती पत्र दिले.
यावर सविस्तर चर्चा होऊन आजच सकाळी 10 वाजता पंढरपूर येथे नियोजित संत नामदेव स्मारक जागेचे पाहणी पंढरपूर प्रशासनाचे अधिकारी व नामदास परिवाराचे16वे वंशज ह भ प माधव, मुकुंद नामदास महाराज व एकनाथ ,निवृत्ती महाराज व महेश ढवळे,नंदकुमार कोसबतवार ,मनोज भांडारकर पंढरपूर समाजाध्यक्ष गणेश उंडाळे राजेश धोकटे , व पश्चिम महाराष्ट्र युवा संपर्कप्रमुख प्रथमेश परांडकर व शिंपी समाज बांधव या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर जागेची पाहणी केली व आता स्मारकाला कुठल्याही प्रकारचा अडथळा नसून लवकरच हे स्मारक पूर्ण व्हावे ही आशा व्यक्त केली लाखो संत नामदेव महाराजांच्या भक्तांसाठी हे स्मारक प्रेरणादायी व आशादायी होणार असून यासाठी आता सर्व समाजाने एकसंघ होऊन या स्मारकाला भव्य करण्याचं संकल्प करावा.
अध्यक्ष महेश ढवळे