माळशिरस प्रतिनिधी तेज न्यूज
सदाशिवनगर येथील रहिवासी सागर जयराम उरवणे हे गेल्या 21 वर्षापासून LIC विमा प्रतिनिधी म्हणून काम करीत आहेत विमा क्षेत्रातील अत्यंत बहुमानाचा समजला जाणारा MDRT अमेरिका हा पुरस्कार त्यांना नुकताच जाहीर झाला असून त्यानिमित्ताने युवा नेते अर्जुनसिंह मोहिते पाटील यांनी त्यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या आहेत.
सागर उरवणे हे हा पुरस्कार गेल्या तीन वर्षापासून सातत्याने मिळवत आले आहेत त्यांचा जनसंपर्क दांडगा असून गेल्या तीन वर्षात ग्रामपंचायत सदाशिवनगरला LIC विमा ग्राम पुरस्कार सलग तीन वेळा मिळवून दिलेला आहे तसेच गेल्या वर्षी ग्रामपंचायत पुरंदावडे ला LIC विमा ग्राम हा पुरस्कार मिळवून दिला आहे.
हा पुरस्कार मिळवण्यासाठी त्यांना त्यांचे विकास अधिकारी शशिकांत निकम तसेच अकलूज शाखेचे शाखाधिकारी अनोकर आणि पंढरपूर शाखेचे शाखाधिकारी प्रवीण गुळवणे यांचे मार्गदर्शन लाभले या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.