विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या प्रभाकर टेके.सुलभा वठारे.आणि अतुल बावकर यांची निवड
करकंब प्रतिनिधी तेज न्यूज
श्री चौंडेश्वरी मंदिर कोष्टी समाज ट्रस्टच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे दिल्या जाणाऱ्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तिंची निवड करण्यात आल्याची माहिती श्री चौंडेश्वरी मंदिर कोष्टी समाज ट्रस्टच्या वतीने सांगितले.रविवार दिनांक १९ जानेवारी रोजी सायंकाळी ४:०० वाजता श्री शाकंभरी गार्डन सोमवार पेठ याठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
यामध्ये करकंब येथील उद्योजक आणि श्री चौंडेश्वरी महिला पतसंस्थेचे मार्गदर्शक प्रभाकर भाऊ टेके यांना करकंब कोष्टी समाज भूषण पुरस्कार.कै.पंढरीनाथ (आण्णा) दुधाणे स्मृती शिक्षण रत्न पुरस्कार सोलापूर जिल्हा परिषद योजना विभागाच्या शिक्षणाधिकारी सुलभा वठारे तर कै.गोरख रामचंद्र इदाते स्मृती उद्योगरत्न पुरस्कार नातेपुते येथील उद्योजक अतुल बावकर यांना जाहीर करण्यात आला.
हा पुरस्कार गेली अनेक वर्षांपासून देण्यात येत असून यावर्षीचा हा पुरस्कार मल्लिकार्जुन मंदिर देवस्थान पीठाचे सद्गुरू संकेश्वर स्वामी यांच्या शुभहस्ते देण्यात येणार असून महाराष्ट्रातील ख्यातनाम व्याख्याते प्रशांत सरुडकर यांचे व्याख्यान ही आयोजित करण्यात आले असून श्री चौंडेश्वरी पौष पौर्णिमा निमित्ताने महिलांसाठी विविध स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या होत्या.
त्या स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ ही संपन्न होणार असून करकंब मधील सर्व ग्रामस्थांनी आणि महिलांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन श्री चौंडेश्वरी मंदिर कोष्टी समाज ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.
संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष मिलिंद उकरंडे सचिव विजय भागवत ज्ञानेश्वर दुधाणे धनंजय इदाते संतोष पिंपळे संतोष बुगड.राजेंद्र टकले.संजीवकुमार म्हेत्रे संतोष टकले.मोहन बोधे.सर्व कोष्टी समाज बांधवां बरोबर महिलाही विशेष परिश्रम घेत आहेत.