मुंबई प्रतीनिधी गणेश हिरवे
गांधी बालमंदिर हायस्कूल कुर्ला मध्ये आज नशा मुक्त भारत अभियाना अंतर्गत जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
सध्याच्या युगात जवान पिढी ही नशेच्या आहारी जाऊन आपले जीवन उध्वस्त करत आहे. समजामध्ये जनजागृती व्हावी समाज नशा मुक्त व्हावा या साठी रॅलीचे आयोजनकरण्यात आले होते.यामध्ये तीन महाराष्ट्र बटालियन आर्मी युनिट चे एनसीसी कॅडेट व आर. एस.पी.कॅडेट , स्काऊट गाईडचे कॅडेट सहभागी झाले होते. नशा मुक्त भारत संबंधी शपथ सर्व कॅडेटनी घेतली.
सदर रॅलीचे आयोजन शाळेचे एन सी सी ऑफिसर विश्वनाथ पांचाळ यांनी केले.आर. एस. पी. अधिकारी अमोल जागले स्काऊट अधिकारी अवधूत चव्हाण गाईड प्रमुख प्रणिता रुईकर, संखे यांनी या रॅलीमध्ये सहभाग घेतला. सदर कार्यक्रमासाठी मोलाचे मार्गदर्शन शाळेचे पर्यवेक्षक रवींद्र खोंडे मुख्याध्यापक अनिल पांचाळ यांनी केले.