पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
पुसेगाव ता. खटाव येथे श्री सेवागिरी महाराजांच्या यात्रेनिमित्त घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय खिलार गायप्रदर्शनामध्ये कौठाळी ता. पंढरपूर येथील पै. शामराव नागटिळक यांच्या ऐश्वर्या या खिलार गायीने ओपन गटामध्ये प्रथम क्रमांक मिळवला आहे.
मठाधिपती श्री महंत सुंदर गिरीजी महाराज यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन शामराव नागटिळक यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी यात्रा कमिटीचे चेअरमन सुरेश जाधव, संतोष जाधव, संतोष वाघ, सचिन देशमुख,गौरव जाधव, गणेश नागटिळक यांच्यासह बहुसंख्य मान्यवर उपस्थित होते. यापूर्वीही शामराव नागटिळक यांच्या ऐश्वर्या खिलार गायीने महाराष्ट्रातील विविध प्रदर्शनामध्ये यश मिळवले आहे.
निवड झाल्यानंतर पै. शामराव नागटिळक, गणेश नागटिळक यांचे ग्रामस्थांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.