पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस के एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग महाविद्यालयातील कॉम्प्युटर सायन्स अॅण्ड इंजिनिअरिंग विभागाने ओपन सोर्स टेक्नॉलॉजीज या विषयावर फॅकल्टी डेव्हलपमेंट वर्कशॉप आयोजित केला होता. हा वर्कशॉप दिनांक 2 डिसेंबर ते 6 डिसेंबर 2024 पाच दिवसांचा होता. यामध्ये मेकॅनिकल इंजीनियरिंग, इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग, सिव्हील इंजीनियरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, अशा वेगवेगळ्या विभागातील शिक्षकांनी तसेच ऑफीस स्टाफ, लॅब असिस्टंट, टेक्निकल असिस्टंट यांनी आपली उपस्थिती नोंदवली व उत्स्फूर्त प्रतिसाद दिला अशी माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
या वर्कशॉप मार्गदर्शक म्हणून कॉम्प्युटर सायन्स अँड इंजीनियरिंग विभाग प्रमुख डॉ सुभाष पिंगळे तसेच नामदेव सावंत, सुमित इंगोले (असिस्टंट प्रोफेसर) यांनी कार्य केले.
या कार्यशाळेत त्यांनी ओपन सोर्स टेक्नॉलॉजीज व त्याचे महत्त्व तसेच ओपन सोर्स टेक्नॉलॉजी वर कसे काम करायचे याचे सखोल मार्गदर्शन केले. या फॅकल्टी डेव्हलपमेंट वर्कशॉपसाठी एस के एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग, पंढरपूर 120 हून अधिक जण उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन धनश्री भोसले यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री संदीप लिंगे यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रदर्शन श्री उदयकुमार फुले यांनी केले.