भाळवणी प्रतिनिधी तेज न्यूज
महाराष्ट्र राज्य कला संचालनालय मुंबई यांचे तर्फे घेण्यात आलेल्या शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षेत रयत शिक्षण संस्थेचे, न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स भाळवणी.ता.पंढरपूरचे एलिमेंटरी व इंटरमिजिएट ग्रेड परीक्षेत घवघवीत यश विद्यार्थ्यांनी प्राप्त केले.
एलिमेंटरी ग्रेड परीक्षेचा निकाल ९८.८८ टक्के व इंटरमिजिएट परीक्षेचा निकाल ९८.३६टक्के लागला.एलिमेंटरी ग्रेड परीक्षेत १०विद्यार्थांने 'ए'ग्रेड व२२विद्यार्थांने 'बी'ग्रेड प्राप्त केली.
'ए'ग्रेडमध्ये अनुष्का टाकणे,आरती नांगरणे, ज्ञानेश्वरी कारंडे, प्रचिती शिंदे,श्रेया नागणे, श्रेया जमदाडे, ऋतुजा गाडे, साक्षी नारनवर, साक्षी शिंदे,संचिता शिंदे यांनी यश मिळवले.तसेच इंटरमिजिएट ग्रेड परीक्षेत 'ए'ग्रेडमध्ये ७ विद्यार्थ्यांनी व 'बी' ग्रेड मध्ये २९ विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले.
'ए'ग्रेडमध्ये अक्षता म्हेत्रे, आसावरी माने, ओंकार माळवदे,संचिता सुळे,शिवराज चोरमले, सृष्टी मरगर,स्वरांजली जमदाडे यांनी यश मिळवले.
या विद्यार्थांना कलाशिक्षक गोंजारी डी.एल.व कलाशिक्षक श्री.खरात टी.एस. जमदाडे जी .डी , काळे एस. के , कुमरे आय ए .यांचे मार्गदर्शन लाभले.
शासकीय ग्रेड परीक्षा २०२४ .
इंटरमिजिएट निकाल जाहिर झाला असून.
A- ग्रेड मध्ये . ७ विद्यार्थी .
B- ग्रेड मध्ये २९ विद्यार्थी .
C- ग्रेड मध्ये २४ विद्यार्थी .
सदर परीक्षेमध्ये ६१ विद्यार्थी बसले त्यापैकी ६० विद्यार्थी पास झाले .विद्यालयाचा शे निकाल . ९८.३६ % लागला आहे.
शासकीय ग्रेड परीक्षा २०२४ .
इलेमेंटरी निकाल जाहिर झाला असून.
A- ग्रेड मध्ये .10 विद्यार्थी .
B- ग्रेड मध्ये 22 विद्यार्थी .
C- ग्रेड मध्ये 57 विद्यार्थी .
सदर परीक्षेमध्ये 90 विद्यार्थी बसले त्यापैकी 89 विद्यार्थी पास झाले .विद्यालयाचा शे निकाल 98.88 % लागला आहे.
यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचे स्कूल कमिटी सदस्य चेअरमन संभाजी राजे शिंदे स्कूल कमिटीचे सर्व सदस्य,शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, पालक संघाचे सर्व सदस्य,सरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्य,सर्व ग्रामस्थ,विद्यालयाचे प्राचार्य रोकडे एस.डी.व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.