भाळवणी प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील डिव्हीपी उद्योग समूह व द पीपल मल्टीस्टेट को ऑप सोसायटी ली धाराशिव शाखा भाळवणीच्या वतीने पत्रकार दिनाच्या निमित्ताने पत्रकार बांधवांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार आनंद देशपांडे,नितीन शिंदे व प्रशांत माळवदे यांचा शाल, श्रीफळ,फुल, दिनदर्शिका देऊन शाखाधिकारी अमर सातपुते यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.यावेळी देशमुख धनश्री, निराळी हर्षदा आदि उपस्थित होत्या.
यावेळी सातपुते यांनी ठेवी,कर्ज, आरडी व मल्टीस्टेट यांच्या वतीने ठेवीदारांना वार्षिक 13 % व्याज देत असल्याचे सांगितले.यावेळी आभार आनंद देशपांडे यांनी मानले.