पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
सिंहगड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग कोर्टी पंढरपूर येथील स्थापत्य अभियांत्रिकी विभागात दिनांक 9 डिसेंबर ते 13 डिसेंबर 2024 या दम्यान एक आठवडा फॅकल्टी डेव्हलपमेंट कार्यशाळा संपन्न झाल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
ही कार्यशाळा ई टॅब्स सॉफ्टवेअर या विषयावरती आयोजित करण्यात आला होता. संबंधित प्रोग्रामचे प्रशिक्षक म्हणून केंड डेस्क बालाजी नगर पुणे चे चेअरमन श्री पराग देशमुख उपस्थित राहिले. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने झाले. यावेळी प्रशिक्षक श्री पराग देशमुख यांचा प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
यावेळी प्राचार्य डॉ. कैलास करांडे, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, विभाग प्रमुख डॉ श्रीगणेश कदम व डीन रिसर्च डेव्हलपमेंट डॉ. चेतन पिसे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमात स्थापत्य अभियांत्रिकी विभागातील शिक्षकांनी व इतर शिक्षकांनी सहभाग नोंदवला. या सॉफ्टवेअरचा शैक्षणिक तसेच इंडस्ट्रियल उपयोग व गरज लक्षात घेऊन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
हा कार्यक्रम केंड डेस्क बालाजी नगर आणि पुणे कन्स्ट्रक्शन इंजिनिअरिंग रिसर्च फाउंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. यशवंत पवार यांनी केले. या कार्यक्रमाचे समन्वयक श्री मिलिंद तोंडसे तसेच स्थापत्य अभियांत्रिकी विभागातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.