पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये कार्यरत असलेले उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांना रोटरी क्लब पंढरपूर यांचेकडून "नेशन बिल्डिर अवॉर्ड" पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.
राष्ट्र घडविण्यात शिक्षकांचे योगदान महत्वपूर्ण असते. समाजासाठी शिक्षकांप्रतीचा आदर, कृतज्ञता व्यक्त करण्यासह चांगले काम करणाऱ्या शिक्षकांना प्रोत्साहित करण्याच्या भावनेतून पंढरपूर रोटरी क्लब यांच्याकडून पाच शिक्षकांना नेशन बिल्डिर अवॉर्ड पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.
पंढरपूर सिंहगड इंजिनिअरिंग काॅलेज मध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात डाॅ. अरूण गायकवाड, प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, रोटरी क्लब पंढरपूर अध्यक्ष सोमेश गानमोटे, सचिव लक्ष्मीकांत कोडगिरी आदींच्या हस्ते पुष्पगुच्छ व सन्मानपत्र देऊन नेशन बिल्डिर अवॉर्ड पुरस्कार पाच शिक्षकांना प्रदान करण्यात आले.
सिंहगड इंजिनिअरिंग काॅलेज मध्ये आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिशा होनमाने व वरदा बिडकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार डाॅ. अतुल आराध्ये यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रोटरी क्लब पंढरपूर यांनी परिश्रम घेतले.