पाहुण्यांनी केले ‘जावा’ विषयी मार्गदर्शन
पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग या विभागात ‘ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग इन जावा स्पेशलायझेशन' या विषयावर तब्बल दहा दिवसीय कार्यशाळा संपन्न झाली.
स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली व इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगच्या विभागप्रमुख डॉ.मिनाक्षी पवार यांच्या नेतृत्वाखाली आयोजिलेल्या या कार्यशाळेचे उदघाटक म्हणून पुण्यातील सॉफ्टेक सोल्युशन अँड ट्रेनिंगचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र शिवकुमार स्वामी हे होते. दिप प्रज्वलनानंतर विभागप्रमुख डॉ.सुमंत आनंद यांनी प्रास्तविकात या कार्यशाळेबाबत माहिती केली. आय. टी. क्षेत्रामध्ये आवश्यक असणाऱ्या जावा या भाषेमधील जावा आणि स्ट्रिंग्सच्या मूलभूत गोष्टींवर विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना ‘ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग इन जावा स्पेशलायझेशन' च्या मूळ संकल्पनेची ओळख करून दिली. विद्यार्थ्यांना या संगणक भाषेमधील वेगवेगळ्या प्रकारच्या ऑपरेशन्ससह फाइल हाताळणीचे प्रशिक्षण दिले गेले. विद्यार्थ्यांकडून वेगवेगळ्या प्रकारचे ऑपरेशन प्रात्यक्षिकांसह करून घेण्यात आले. या कार्यशाळेमध्ये सी.आणि सी. प्लस प्लस चा आढावा घेत जावा भाषेचा इतिहास, त्यातील चिन्हे, वेगवेगळ्या ऑपरेशन्स अशा विविध गोष्टी शिकवल्या गेल्या. जावा मधील कलेक्शन फ्रेम्सचे कार्य, अॅरे आणि कलेक्शन फ्रेम वर्क प्रोग्राममधील फरक स्पष्ट करण्यात आला. यामध्ये डेटाबेस कनेक्टिव्हीटी जेडीबीसी आणि संबंधित बाबींचे प्रशिक्षण दिले गेले. यामध्ये कन्सोल ॲप्लीकेशन, युआय डिजाइन सहाय्यक यासारखे जावा मधील भाग जे युनिट टेस्टिंग एक्झिक्युट हे सक्षम ‘जार’ फाईल्स तयार करतात त्यांचे कार्य पटवून देण्यात आले. या आयोजिलेल्या जावा कार्यशाळेत जवळपास १४५ विद्यार्थी सहभागी झाले होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.एस.वाय.अभंगराव यांनी केले तर डॉ. एन.पी. कुलकर्णी यांनी आभार मानले.