पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील वसंतराव काळे विद्यामंदिर या प्रशालेतील इयत्ता सहावीतील विद्यार्थी शिवतेज अंकुश गायकवाड याचा दिनांक २४/१०/२०२४ वार गुरुवार रोजी सोलापूर येथे अयोजित करण्यात आलेल्या शालेय जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत प्रथम क्रमांक आला. तसेच त्याची सोलापुर जिल्ह्यातुन विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली.
त्याच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष कल्याणराव काळे , सचिव हणमंत जमदाडे प्रशालेचे मुख्याध्यापक एस एल काळे सर्व शिक्षक,शिक्षिका यांनी अभिनंदन केले व विभागीय स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.
तसेच या स्पर्धेसाठी प्रशालेतील क्रिडाशिक्षक एस.एम.चौगुले व एन.एस जाधव यांनी बहुमोल्य मार्गदर्शन केले.