एक अनोखा उपक्रम
सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
सोलापूर येथील श्री सिद्धेश्वर देवस्थान संचलित श्री सिद्धेश्वर इंग्लिश मीडियम स्कूलकडून एक अनोखा उपक्रम राबवण्यात आला. तो उपक्रम म्हणजे एक मूठ अनाज. यावेळी श्री सिद्धेश्वर देवस्थान संस्थेचे अध्यक्ष शिक्षण समितीचे चेअरमन धर्मराज काडादी व शिक्षण समितीचे सदस्य राजशेखर येळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला.
एक मूठ अनाज म्हणजे इयत्ता नर्सरी ते चौथी वर्गाच्या मुलांनी वेगवेगळ्या प्रकारचे धान्य, दिवाळी सामान ,कपडे, तेल,दिवे असे विविध प्रकारच्या वस्तू मुलांनी शाळेत जमा केले .ते जमा केलेले साहित्य अंधशाळेतील मुलांना भेट देण्यात आले. काही वस्तू रुपात, धान्य रूपात तेही मूल दिवाळी उत्साहात साजरी करावी म्हणून हा उपक्रम राबवण्यात आला. आणि यातून मुलांना सुद्धा एक समाज कार्य काय असतं हे या उपक्रमातून माहिती सांगण्यात आली. यावेळी श्री सिद्धेश्वर इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका नीता सोमवंशी यांच्या हस्ते अंध विद्यार्थ्यांना भेटवस्तू देण्यात आल्या.
तसेच अंधशाळेचे मुख्याध्यापक दर्शनाळे ,रोटरी क्लबच्या अध्यक्षा माखिजा मॅडम तसेच सचिव म्हणून असलेले संतोष भंडारी यांनी या उपक्रमाचे तोंड भरून कौतुक केले. ते यावेळी म्हणाले की, असे मोटिवेट करणारे असतील तर खरंच ही मुलं उद्याचा भविष्य नक्कीच घडवतील. तसेच विविध प्रकारच्या मुलांनी बनवलेल्या वस्तू दाखवण्यात आल्या. तसेच मुलांनी ब्रेल लिपीचा वापर करून केलेला अभ्यास तसेच संगणक प्रात्यक्षिक सुद्धा दाखवण्यात आले. खरंच या मुलांचे कौतुक करावे तितके कमी आहे, असे शाळेच्या मुख्याध्यापिका म्हणाल्या आणि मुलांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर उपस्थित होते.